27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeRatnagiriयंदा २८ गावांना पाणीटंचाईचे चटके

यंदा २८ गावांना पाणीटंचाईचे चटके

गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.

पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा संख्येत गावांच्या घट झाली आहे. तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत. यात ८१ वाड्यांचाही समावेश आहे. गतवर्षी ३२ गावातील ५२ वाड्यांचा समावेश होता. तालुक्यात प्रशासकीय पातळीवरून पाणीटंचाईची समस्या संपुष्टात आणण्याच्यादृष्टीने ठोस प्रयत्न केले जात आहेत. तरी पाणीटंचाई तालुक्याच्या पाचवीला पुजल्यासारखीच झाली आहे. दरवर्षी पहिला टँकर खेड तालुक्यातुनच धावतो. याशिवाय सर्वाधिक दिवस गाववाड्यांना पाणीपुरवठा तालुक्यात करावा लागतो.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. ही बाब प्रशासनासाठी दिलासादायक ठरली आहे. गत महिन्यात आमदार योगेश कदम यांनी टंचाईकृती आराखडा बैठक घेत पाणीटंचाईवर मात करण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंब करण्याबाबत सूचित केले आहे. याशिवाय जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने देखील आवश्यक ती कार्यवाही करण्यासह नळपाणी योजनांची रखडलेली कामे एप्रिल अखेरीस पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

गतवर्षीच्या वाड्या आराखड्यात कायम – यावर्षीच्या टंचाई आराखड्यात गतवर्षातील तहानलेल्या गाववाड्या कायमच राहिल्या आहेत. वावेतर्फे नातू-ढेबेवाडी, कशेडी-थापेवाडी, बोरटोक, बंगला, शिंदेवाडी, तळे-धनगरवाडी, पालांडेवाडी, बौद्धवाडी, कासारवाडी, आदिवासीवाडी, चिंचवाडी, कळंबणी बुद्रुक, दंडवाडी, खवटी, खालची धनगरवाडी, वरची धनगरवाडी, मंडलिक कोंड, तुळशी खुर्द-धनगरवाडी, शिरवली-दंडवाडी, निळवणे- कातळवाडी, सुतारवाडी, घेरारसाळगड, निमणीवाडी, भराडे धनगरवाडी, भराडेवाडी, धापडेवाडी, पेठ बौद्धवाडी, धनगरवाडी आदी गाववाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या गावांना टंचाई भासण्याची शक्यता – मांडवे-कोसुमवाडी, कुडवेवाडी, धाकटे मांडवे, अस्तान- कातकरवाडी कातकरवाडी नं. २, जोरकरवाडी, चाटव-धनगरवाडी, दहिवली – फणसवाडी, शिंगरी-फौजदारवाडी, पैलूचीवाडी, जैतापूर- धनगरवाडी, तिसंगी-धनगरवाडी, आंबवली-भिंगारा, भिंगारवाडी, माणी-शिंदेवाडी, ऐनवरे-दळवणकरवाडी, धामणी-काजारकोंड, बौद्धवाडी, कदमवाडी, सिमेवाडी, पलित्राकोंड, दिगेवाडी, हेदली, पोयनार पाटीलवाडी. बौद्धवाडी, अलाटेवाडी, झेंडेवाडी, मधलीवाडी, मानेवाडी आदी वाड्यांतील ग्रामस्थांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय घेरारसाळगड किल्लेमाची, तिसे पड्याळवाडी, शिगवणवाडी, शिंदेवाडी, बौद्धवाडी नं. २, सकपाळवाडी, भिलारे आयनी- खोतवाडी, खोंडेवाडी, गवळीवाडी, बौद्धवाडी, सुसेरी देवसडे-सावंतवाडी यांसह अन्य गाववाड्यांचाही समावेश टंचाई आराखड्यात करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular