25.1 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunचिपळूण नगरपालिकेची ७८ खोके व हातगाडी धारकांवर हातोडा

चिपळूण नगरपालिकेची ७८ खोके व हातगाडी धारकांवर हातोडा

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे मुख्य गटर बूजून गेले होते. 

गेल्या काही महिन्यांपासून येथील मध्यवर्ती बसस्थानक व शहरातील भोगाळे परिसरात हातगाडी व खोकेरधारकांचे अतिक्रमण वाढले होते. या अतिक्रमण विरोधात नगरपरिषदेने गुरूवारी हातोडा उगारत, मोठी कारवाई केली. तब्बल ७८ खोके व हातगाडी धारकांवर कारवाई करण्यात आली. यातील काहींचे साहित्य जप्त केले. चिंचनाका ते पॉवर हाउस दरम्यान अतिक्रमण केलेल्या जागेत खोदाई करून बंदोबस्त केला आहे. तसेच यापुढे याभागात पुन्हा अतिक्रमण झाल्यास संबंधीतावर नगरपरिषदे मार्फत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया राबवली जाणार आहे. नगरपरिषदेने दोन महिन्यांपुर्वी बाजारपेठसह उपनगर भागात तसेच चिंचनाका ते पॉवर हाऊस दरम्यान अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. मात्र त्यानंतर ही कारवाई थंडावताच पुन्हा त्याचठिकाणी मोठ्या संख्येने अतिक्रमण झाले होते. रस्त्यालगत खोके उभारून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी ठेवल्याने पादचाऱ्यासह वाहतूकदारांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याविषयी गेल्या काही दिवसांपासून ओरड सुरू होती. याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे मुख्य गटर बूजून गेले होते.

त्यामुळे या भार्गातील सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. गटारे तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.. अखेर नगरपरिषदेने संबंधीत खोके व हातगाडीधारकांना साहित्य हटविण्यासाठी मुदत दिली होती. मात्र तरिही संबंधीतांनी खोकी न हटवल्याने गुरूवारी नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहिम जोरदारपणे राबवली. मध्यवर्ती बसस्थानक व भोगाळे परिसरातील ७८ हुन अधिक खोके व हातगाड़ी धारकांवर कारवाई केली. ३ जेसीबी व ३ डंपरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये काहींचे साहित्य जप्त करून नगरपरिषदेकडे जमा केले आहे. तर काहींनी स्वतःहून साहित्याची विल्हेवाट लावली. मात्र नगरपरिषदेने अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे व्यावसायीकांची पळापळ झाली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, वैभव निवाते, रोहिणी खाडे, संदेश टोपरे, बांधकाम अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजीत जाधव, संतोष शिंदे, राजेंद्र जाधव, वलित वांगडे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular