26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriडेल्टा प्लसचा राज्यातील पहिला बळी

डेल्टा प्लसचा राज्यातील पहिला बळी

संगमेश्वर रत्नागिरी येथील मागील आठवडाभर चर्चेत असणारे डेल्टा प्लस व्हेरीअंट रुग्ण आहे कि नाही या प्रकरणावर आज अजून प्रकाश पडला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरीअंट डेल्टा प्लसचा रुग्ण आहे कि नाही यावरून परस्पर विरोधी वक्तव्यावरून जन सामान्यांमध्ये संभ्रमित अवस्था निर्माण झालेली.

आज संगमेश्वरमधील डेल्टा प्लस व्हेरीअंट सदृश्य रुग्ण असलेल्या ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. राज्यात रत्नागिरी संगमेश्वरमध्ये असणाऱ्या ९ रुग्णांपैकी आज एक ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, उर्वरीत ८ रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती आज रत्नगिरी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सदर डेल्टा विषाणूचा संसर्ग झालेल्या मृत महिलेला अन्य सह्व्याधी सुद्धा असल्याचे बोलले जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे डेल्टा प्लस रूग्ण सापडलेल्या पाच गावांना कंटेनमेंट झोन लागू करण्यात आला असून, ग्रामस्थांची सरसकट चाचण्या केल्या जात आहेत व चाचण्यांचे प्रमाण देखील वाढविण्यात आले आहे.

देशामध्ये सद्य स्थितीला डेल्टा प्लस व्हेरीअंटमुळे दोघांचा मृत्यू झाला असून, महाराष्ट्रातील संगमेश्वर येथे डेल्टा प्लस व्हेरियंटने बाधित ८० वर्षीय वृद्धेचे निधन झाले आहे तर मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे आणखी एका महिलेचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लस व्हेरीअंट संसर्ग झालेल्या महिलेचा मृत्यू हा राज्यातील पहिला बळी ठरण्याची शक्यता असल्याचे वर्तविले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular