27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeSportsबॅडमिंटन सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी, परंतु, पी.व्ही. सिंधूची दमदार कामगिरी

बॅडमिंटन सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी, परंतु, पी.व्ही. सिंधूची दमदार कामगिरी

सिंधूने मलेशियाच्या गोह जिन वेईवर सरळ दोन गेम्समध्ये विजय साकारल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या बॅडमिंटनच्या सांघिक सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधूने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. पण भारताच्या अन्य बॅडमिंटनपटूंना लौकिकाला साजेसा खेळत करता आले नाही आणि त्यामुळेच भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. भारताला यावेळी बॅडमिंटनच्या सांघिक गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मलेशियाने भारताला ३-१ असे पराभूत केले आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सिंधूने आपल्या आजच्या सामन्यात दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले. सिंधूने मलेशियाच्या गोह जिन वेईवर सरळ दोन गेम्समध्ये विजय साकारल्याचे पाहायला मिळाले. सिंधूने पहिल्या गेममध्ये २२-२० अशी बाजी मारली. पहिल्या गेममध्ये सिंधू आणि वेई यांच्यामध्ये चुरशीचा सामना झाला, पण सिँधूने अनुभव पणाला लावला आणि पहिले गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने धडाकेबाज खेळ केला. दुसरा गेम सिंधूने २१-१७ असा जिंकला आणि वेईवर विजय साकारला. सिंधूच्या विजयामुळे भारताला मलेशियाबरोबर १-१ अशी बरोबरी करता आली.

किदम्बी श्रीकांतकडून भारताला यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्याला मलेशियाच्या टिझयंगकडून १९-२१, २१-६ आणि १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा भारत १-२ अशा पिछाडीवर पडला. त्यानंतर भारत आणि मलेशिया यांच्यामध्ये महिला दुहेरीचा निर्णायक सामना सुरु झाला. हा सामना गमावल्यावर भारताला सुवर्णपदक हुलकावणी देऊ शकत होते. या सामन्यात भारताची चांगली सुरुवात झाली नाही. गायत्री गोपिचंद आणि थ्रीसा जॉली यांनी मलेशियाच्या मुरलीथरन थिनाह आणि कुंग ले पीअर्ली तान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले.

तत्पूर्वी, भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक रानकीरेड्डी यांचा सामना आजच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या टेंग फाँग आणि वुई इक सो यांच्याबरोबर झाला. या सामन्यातील पहिला गेम चांगलाच रंगतदार झाला. पण भारताला पहिल्या गेममध्ये तीन गुणांनी पराभव पत्करावा लागला. भारताने पहिला १८-२१ असा गमावला होता. दुसऱ्या गेममध्येही ही भारताची जोडी ७-११ अशी पिछाडीवर होती. दुसरा गेम या जोडीने १५-२१ असा गमावला आणि भारत ०-१ अशा पिछाडीवर पडला.

RELATED ARTICLES

Most Popular