प्रसूतीनंतर
घ्यायची
काळजी
1
प्रसूतीनंतर कमीतकमी एक ते दीड महिना विश्रांती घेतलीच पाहिजे.
2
प्रथम मातांना बऱ्याच गोष्टी माहित नसतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवजात बाळाची जबाबदारी.
3
मातांना दर दोन-तीन तासांनी स्तनपान करावे लागते. बहुतांशी बाळं रात्री जागी असतात व दिवसा झोपतात.
4
बाळंतिणीच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, वरण (वाटीभर) भात, भाजी पोळी, सॅलडचा समावेश असावा.
5
याशिवाय अंडी, शेवग्याच्या शेंगाचे सुप, चिकन-मटन व इतर भाज्यांचे सुप यांचा समावेश करावा.
6
बाळंतिणीला तिळ, नारळ किंवा ऑलिव्ह तेलाने मालिश करण्याची पद्धत आहे. त्यामुळे बाळंतिणीचा थकवा, ताण कमी होण्यास मदत होते.
7
मानसिक व शारिरीक आराम अतिशय महत्त्वाचा आहे. लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट, टीव्ही या सर्व उपकरणांपासून पूर्णपणे दूर रहावे.
8
बाळंतिणीची व्यक्तिगत स्वच्छता, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हलकासा व्यायाम या बाबींकडे लक्ष असावे.
9
या दिवसांत स्वतःची काळजी, बाळाची काळजी, खाणे-पिणे याबरोबरच लोह व कॅल्शिअमच्या गोळ्या डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे चालू ठेवाव्यात.
10