महाराष्ट्रीयन पारंपारिक
साज
1
सोनेरी मण्यांची नथ. अगदी ठसठशीत आकाराची ही नथ पाहताक्षणीच नजरेत भरते.
2
लक्ष्मीच्या प्रतिकृती असणारा हा हार गळ्याला बसतो. अगदी पारंपरिक डिझाइनच्या या हारात लाल आणि हिरवे मणी, सोनेरी मणी, चकत्या अशा एकाखाली एक लेअर्स आहेत.
3
चिंचपेटी ही प्रामुख्याने मोत्याची असते. क्वचित सोन्याच्या पातळ उभ्या पेट्या जोडलेल्या स्वरूपातही असू शकते.
4
छोट्या मण्यांचा गळ्याबरोबर असलेला हा दागिना म्हणजे ठुशी. मण्यांच्या आकारामुळे हा नाजूक तर दिसतोच, आणि समारंभात लहान मुलींनाही शोभून दिसतो
5
लहान बोराच्या आकाराच्या मण्यांची माळ म्हणजे बोरमाळ. बोरमाळ बनवायला खूप जास्त सोनं लागत नाही.
6
बुगडी म्हणजे महाराष्ट्राची खासियत. कानाच्या पाळीच्या वरच्या भागाचं लेणं असलेली ही बुगडी प्रिय आहे.
7
वज्रटीक हादेखील गळ्यासोबत बसणारा दागिना. फक्त हा उंच नाही तर गळ्याच्या मुळाशी येऊन विसावतो.
8
मराठी दागिन्यांची यादी कोल्हापुरी साजाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही
9
नऊवारी आणि त्यासोबत दंडात घातलेली वाकी मराठमोळ्या स्त्रीचं सौंदर्य आणखीचं वाढवतात.
10