अभिनेत्री प्रियांका चोप्रा

1

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

2

भारतात तसंच हॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

3

आज प्रियांका अनेक तरुणींसाठी आदर्श ठरत असली तरी अभिनेत्रीने आज जे स्थान मिळावलं आहे तिथपर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता.

4

जेव्हा तिनं बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा सावळ्या रंगामुळे अनेकदा अवहेलना सहन करावी लागली होती.

5

प्रियांकानं सांगितलं की, 'बॉलिवूडमध्ये मला काळी मांजर, सावळी म्हटलं जायचं. सावळी म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न मला अनेकदा पडायचा.

6

माझ्याहून गोऱ्या असणाऱ्यांपेक्षा मी चांगलं काम करू शकते हा विश्वास माझ्यात होता. त्यावेळी या गोष्टी मी फारशा गांभीऱ्यानं घेतल्या नाहीत.

7

गोरा रंग म्हणजे चांगला ही मानसिकता बदलायला हवी.

8

प्रियंका चोप्राने सिंगर निक जोनस यांच्याशी धुमधडाक्यात लग्न केलं.

9

प्रियांका चोप्रा तीन वर्षांच्या कालावधीनंतर भारतात परतली आहे.

10