लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण
1
महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं आज १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन.
2
वयोमानानुसार त्यांची स्मृतीही कमी झालेली. यावर काही उपचार नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरीच ठेवण्याचा सल्ला दिला होता.
3
आई मला नेसव शालू नवा, खेळताना रंग बाई होळीचा, फड सांभाळ तुऱ्याला गं आला, पाडाला पिकलाय आंबा या त्यांच्या अजरामर लावण्या आहेत.
4
यंदाचा २०२२ च्या पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं. व्हिलचेअरवर बसूनच त्यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारला होता.
5
'मला म्हणत्यात पुण्याची मैना' यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या
6
'मराठी चित्रपटसृष्टीत सुलोचना यांचं योगदान फार मोठं आहे कारण त्यांनी स्वतःची एक वेगळी स्टाइल निर्माण केली होती.
7
ठसकेबाज लावण्यांनी सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले होते.
8
१९६५ मध्ये त्यांना लावणी सम्राज्ञी ही पदवी देण्यात आली.
9
सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे.
10