फिफा  विश्वचषक २०२२

1

१८ डिसेंबर हा दिवस जगभरात ऐतिहासिक दिवस ठरला. केवळ फुटबॉल क्षेत्रातच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील लोकांना याची उत्सुकता होती.

2

तब्बल ३६ वर्षांनी अर्जेंटिनाने वर्ल्डकपवर आपले नाव कोरले.

3

लिओनेल मेस्सी या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या नावापुढे विश्वविजेत्याचा टॅग लागला.

4

या वर्ल्डकप विजयात लिओनेल मेस्सीने स्पर्धेत ७ गोल करत वर्ल्डकप विजयाचे स्वप्न साकार केले.

5

फिफा  विश्वचषक २०२२ अर्जेंटिनाने ट्रॉफी जिंकून इतिहास तर रचला मात्र त्यात भारतीचीही चर्चा होती.

6

माजी स्पॅनिश गोलकीपर इकर कॅसिलासने दीपिका पदुकोणसह फिफा विश्वचषक ट्रॉफी लॉन्च केली.

7

दीपिकाचा फुटबॉलशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. तरी, ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी दीपिकाची निवड का करण्यात आली?

8

दीपिका पदुकोणने फिफा  विश्वचषक ट्रॉफी लॉन्च केली. असं करणारी ती पहिली जागतिक स्टार बनली आहे.

9

कारण ह्या ट्रॉफीची केस ग्लोबल लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनने (Louis Vuitton) डिझाइन केलेली आणि बनवली आहे. दीपिका या लक्झरी ब्रँडची अॅम्बेसेडर आहे.

10