28.7 C
Ratnagiri
Tuesday, February 4, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeMaharashtraस्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचे सीएनजी इंधनाच्या दरात घट

स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचे सीएनजी इंधनाच्या दरात घट

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात झाली असून हा सर्वसामान्यांना मिळणारा एक प्रकारे दिलासा ठरणार आहे.

राज्यातील सीएनजी आणि  पीएनजी सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट)  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे दर आज १ एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचे सीएनजी इंधनाच्या दरात घट झाल्याने स्वस्त झाले आहे.

महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम म्हणजेच स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाले आहे. नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो तर पीएनजी ३६ रुपये प्रति एससीएम असेल.

एकीकडे पेट्रोल-डिझेलची भाववाढ सातत्याने होत असताना सामान्य जनता त्यामध्ये होरपळून जात आहे. त्यातच राज्यसरकारने सीएनजी आणि पीएनजीवरील मुल्यवर्धित कर कमी केले. यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात झाली असून हा सर्वसामान्यांना मिळणारा एक प्रकारे दिलासा ठरणार आहे.

सदरची हि कपात सलग चार वेळा दरवाढ झाल्यानंतर करण्यात आली आहे. महानगर गॅसने याआधी सहा महिन्यांत चार वेळा सीएनजी ११.४३ रुपये प्रति किलो तर पीएनजी ६.६८ रुपये प्रति एससीएमने महाग केला होता. परंतु, आता तो दर कमी झाल्याने जनतेमध्ये दिलासाजनक वातावरण पसरले आहे. सततच्या वाढतच जाणाऱ्या महागाईला जनता त्रस्त झाली असून राज्यातील सीएनजी आणि  पीएनजी गॅसच्या दरामध्ये झालेल्या स्वस्ताईमुळे  तेवढाच एक महागैतून दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular