26.5 C
Ratnagiri
Friday, December 19, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriमुंबई-गोवा महामार्गावर वाकेड घाटीत अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड घाटीत अपघात

ट्रेलर चालक आणि क्लिनर जखमी झाले तर ट्रेलर जळून खाक झाला.

चालकाचा ताबा सुटल्याने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रेलर मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटीतील एका अवघड वळणावर खोल दरीत कोसळला. त्यानंतर त्या ट्रेलरने पेट घेतला. शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत ट्रेलर चालक आणि क्लिनर जखमी झाले तर ट्रेलर जळून खाक झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरून माहितीनुसार, सतीश कुमार शिवपूजन गौड (४० वर्षे, रा. कबरा, तालुका शिवनगर, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) हा आपला ताब्यातील ट्रेलरमधून न्हावाशिवा बंदर, मुंबई येथे माल भरून गोव्याकडे चालला होता. बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी तो मुंबईतून निघाला होता. या दरम्यान हा ट्रेलर रस्त्यात सतत बंद पडत होता. यावेळी चालक सतीश गौड हा स्वतः तो ट्रेलर तात्पुरता चालू करून पुढे नेत होता.

वाकेड घाटीत अपघात – असे करत करत हा ट्रेलर शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील वाकेड घाटीत आला. असता उतारावरील एका अवघड वळणावर ट्रेलर चालकाचा ताबा सुटून हा ट्रेलर दरीत पलटी होवून ट्रेलरने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद कांबळे, पोलिस नाईक नितेश राणे, शिवाजी कळंत्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वॉटर सप्लायर नंदकुमार सुर्वे तसेच महामार्ग ठेकेदार यांच्याकडून पाण्याचा टैंकर उपलब्ध करून देण्यात आला. त्याचबरोबर राजापूर अग्निशमन दलाचे बंब देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

यावेळी राजापूर अग्निशमन दलाचे चालक राजू कणेरी, फायरमन अशोक गार्डी, वैभव कांबळी, वाकेड पोलिस प्रशांत भितळे, सरपंच संदीप सावंत, जिजाऊ संस्थेचे योगेश पांचाळ, महेश देवरुखकर, जयवंत जाधव, नंदकुमार सुर्वे, राजू जाधव, मंगेश लांजेकर, मिलिंद गुरव, शिवा उकेली, विवेक कनावजे यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीत ट्रेलर जळून खाक झाला. दरम्यान, या अपघातात ट्रेलर चालक सतीश कुमार गौड याच्यासह क्लिनर ननकू बिंदू हा देखील जखमी झाला. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे हे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular