कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या पहिल्या लाटेमध्ये रिक्षा व्यवसायिक, हातगाडी व्यावसायिक, घरेलू कामगार यांचा रोजगार बंद झाल्याने ते आर्थिक विवंचनेमध्ये होते. हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांसमोर जर काम बंद झाले तर उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
राज्यामध्ये १५ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये रिक्षा व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून शासनाने दिड हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केलेली. उपप्रादेशिक परिवहन विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील १० हजार ९९२ परमीटधारक रिक्षा व्यावसायिकांपैकी ३ हजार १९८ रिक्षा व्यावसायिकांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. तर एकूण ८८० प्रकरणे कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तर ज्या रिक्षा कायमस्वरूपी जिल्ह्याबाहेर गेल्या आहे अशी, १७ प्रकरणे कायमस्वरुपी रद्द करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रत्नागिरीसह संपूर्ण राज्यामध्येच संक्रमितांचे आणि मूत्यू होणार्यांचे प्रमाण सुद्धा अधिकच वाढले. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सुद्धा या सर्व व्यावसायिकांना बसला. परंतु, पहिल्या लाटेची परिस्थिती लक्षात घेता, सरकारने या क्षेत्रातील व्यावसायिकांचा मोठ्या विचार प्रामुख्याने करून, या तिन्ही क्षेत्रातील लोकांना प्रत्येकी १५०० रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. अर्थात त्याला काही नियमावली सुद्धा आखून देण्यात आली होती.
त्यासाठी रिक्षा व्यावसायिकांना रत्नागिरी आरटीओ कार्यालयामध्ये ऑनलाईन कागदपत्र सदर केल्यावर हि मदत मिळणार आहे, त्याच्रमाणे घरेलू कामगारांची नोंद कामगार कल्याण कार्यालय आणि हातगाडी धारकांची नगरपालिकेमध्ये नोंद असणे गरजेचे आहे. २७ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आलेल्या सर्व प्रकरणांचा निपटारा रत्नागिरी आरटीओ कार्यालयामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच रिक्षा चालकांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार असल्याची, आरटीओ सुबोध मेडसीकर यांनी माहिती दिली.