27.5 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriकाजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

अमली पदार्थांची राजरोस विक्री सुरू आहे.

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन शुगरची खुलेआम विक्री करताना एका संशयिताला रंगेहात पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये २५ हजार किमतीची ५ ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. हा संशयित शहरातील मच्छिमार्केट परिसरातील असल्याची माहिती उघड झाली आहे. मगदूम मस्तान शेख (रा.मच्छिमार्केट) करण्यात नाव आहे. असे अटक आलेल्या संशयिताचे पोलिसांनी दिलेली माहिती, संशयित शेख सराईत असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

सुसंस्कृत रत्नागिरीत आता असे अनेक गैरप्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. अमली पदार्थांची राजरोस विक्री सुरू आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याचे समूळ उच्चाटन करण्याच्यादृष्टीने धडक मोहिमा सुरू केल्या. वर्षभरात सुमारे चार कोटींच्या दरम्यान अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आता काजारघटी फाट्यावर ब्राऊन शुगर विकताना शेख या तरुणाला घेतले. गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी आकाश साळुंखे, हवालदार सागर साळवी, योगेश नार्वेकर, दत्तात्रय कांबळे या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात आणखी कोण आहे, या तरुणाचा पुरवठादार कोण आहे, अशा अनेक प्रश्नांची उकल आता पोलिस करणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular