Insta360 नं जागतिक बाजारात Insta360 Ace Pro 2 हा नवीन अॅक्शन कॅमेरा लाँच केला आहे. जो गेल्यावर्षी आलेल्या Ace Pro अॅक्शन कॅमेऱ्याचा अपग्रेड व्हर्जन आहे. त्यामुळे यात जुन्या मॉडेल पेक्षा चांगली इमेज क्वॉलिटी, इजी कॅप्चरिंग, अपग्रेडेड ऑडियो, जास्त रगेड डिजाइन आणि अॅडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलीजेंस (AI) फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग, 39 मीटर पर्यंत वॉटरप्रूफिंग, एक प्रो इमेजिंग चिप आणि Leica इंजीनियर्ड कलर प्रोफाईल असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया Insta360 Ace Pro 2 ची किंमत आणि फीचर्स.
Insta360 Ace Pro 2 ची किंमत – Insta360 Ace Pro 2 ची किंमत 399.99 डॉलर्स (जवळपास 34,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. या स्टँडर्ड बंडलमध्ये ग्राहकांना विंड गार्ड, बॅटरी, स्टँडर्ड माउंट, माइक कॅप आणि एक यूएसबी टाइप-सी केबल मिळते. तर या अॅक्शन कॅमेऱ्याच्या ड्युअल बॅटरी बंडल इतर अॅक्सेसरीज सोबत दोन बॅटरीज दिल्या जातील. या ड्युअल बॅटरी बंडलची किंमत 419.99 डॉलर्स (जवळपास 35,000 रुपये) आहे. हा नवीन अॅक्शन कॅमेरा लवकरच भारतात देखील उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
Insta360 Ace Pro 2 चे स्पेसिफिकेशन – Insta360 Ace Pro 2 मध्ये 1/1.3 इंच 8K सेन्सरचा वापर करण्यात आला आहे, तसेच हा 13.5 स्टॉप पर्यंत डायनॅमिक रेंज आणि एक Leica SUMMARIT लेन्ससह आला आहे. हा MP4 फॉर्मेट मध्ये 30 फ्रेम प्रति सेकंड (FPS), 4K 60fps अॅक्टिव्ह HDR आणि स्लो स्पीड मध्ये 4K तसेच 120fps वर 8K पर्यंत व्हिडीओ कॅप्चर करू शकतो. यात 50 मेगापिक्सल रेजॉल्यूशनवर फोटो कॅप्चर करण्याची क्षमता आहे. अॅक्शन कॅमेऱ्यात प्युअरव्हिडीओ नावाचा एक स्पेशल शूटिंग मोड देखील मिळतो जो नॉयज कमी करणे आणि लो लाइट कंडीशनमध्ये रियल टाइम मध्ये डिटेल्स वाढवण्यासाठी एक कस्टम-ट्यून एआय न्यूरल नेटवर्कचा वापर करतो. Insta360 नुसार Ace Pro 2 व्हॉइस किंवा जेस्चरनं कंट्रोल केला जाऊ शकतो. यात ऑटो एडिट आणि एआय हाइलाइट्स असिस्टंट असे एआय आधारित क्रिएटर-फ्रेंडली फिचर मिळतात.
Insta360 Ace Pro 2 मध्ये 2.5 इंच टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. जो जुन्या मॉडेलच्या तुलनेत 70 टक्के जास्त पिक्सल रेशियो, 6 टक्के जास्त ब्राइटनेस आणि 100 टक्के जास्त ड्युरेबल आहे. अॅक्शन कॅमेऱ्यात स्टेबल व्हिडीओसाठी फ्लोस्टेट स्टेबिलाइजेशन आणि एक ऑटो अॅप्लाइड 360-डिग्री होराइजन लॉक फीचर देखील आहे जो व्हिडीओ स्टेबल ठेवतो. ड्युरेबिलिटीसाठी Insta360 Ace Pro 2 मध्ये एक रिमूव्ह्हेबल लेन्स गार्ड मिळतो तर नवीन विंड गार्ड रेकॉर्ड करताना वाऱ्याचा आवाज कमी करतो. हा कॅमेरा 12 मीटर खोल पाण्यात देखील सुरक्षित राहू शकतो. तसेच -20 डिग्री सेल्सियस पर्यंत थंड तापमान देखील सांभाळू शकतो. अॅक्शन कॅमेरा 1,800mAh बॅटरीसह आला आहे. यात 4K 30fps शूटिंग करण्यासाठी 50 टक्के जास्त रनटाइमसह एक इंडोरन्स मोड आहे. हा कॅमेरा 18 मिनिटांत 80 टक्के आणि 47 मिनिटांत 100 टक्के चार्ज होईल.