23.3 C
Ratnagiri
Tuesday, February 4, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeChiplunमोकळ्या जागांवर कचरा टाकणे थांबवण्यासाठी, उभारणार रॉक गार्डन

मोकळ्या जागांवर कचरा टाकणे थांबवण्यासाठी, उभारणार रॉक गार्डन

सार्वजनिक मोकळ्या जागांवर बेशिस्तपणे कचरा टाकण्याला आळा बसण्याकरिता आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांनी रॉक गार्डनची संकल्पना मांडली.

प्रसिद्ध शिल्पकार नेकचंद सैनी यांनी चंदिगढ येथे जशी रॉक गार्डनची निर्मिती केली. तुटल्या-फुटलेल्या टाकाऊ वस्तू, सामान आणि कचऱ्याने त्यांनी १९७५ मध्ये रॉक गार्डनची संकल्पना सत्यात उतरवली. आणि हेच गार्डन भविष्यात पर्यटकांचे आकर्षण ठरले. चिपळूण कचरा आणि गाळाच्या समस्येने त्रस्त झाले असून तिथे देखील अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे,

शहरी भागात विविध ठिकाणच्या मोकळ्या जागांवर कचरा टाकण्याचा प्रकार थांबवण्यासाठी चिपळूण शहरात चंदिगढ सारखेच रॉक गार्डन करून तेथील परिसर सुशोभित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पालिका प्रशासनाच्या या गांधीगिरीमुळे बेशिस्त नागरिकांना अशा मोकळ्या जागी कचरा टाकण्यास आळा बसणार आहे. शहरातील काविळतळी उपनगर परिसरात प्रायोगिक तत्त्वावर राबवलेला हा उपक्रम यशस्वी झाला आहे.

प्राथमिक सुरवात म्हणून शहरात सार्वजनिक मोकळ्या जागांवर बेशिस्तपणे कचरा टाकण्याला आळा बसण्याकरिता आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांनी रॉक गार्डनची संकल्पना मांडली. परिसरात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणी रॉक गार्डनने सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कचऱ्याच्या जागा सुशोभित झाल्या आहेत. काविळतळी येथे अशा प्रकारचे रॉक गार्डन उभारण्यात आल्यावर तो परिसर आता सुशोभित झाला आहे. आणखी चार ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी गेली कित्येक वर्षे पालिका विविध उपक्रम राबवत आहे. नागरिकांच्या घरातील तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानातील कचरा संकलन करण्यासाठी दररोज घंटागाडीची सुविधाही करण्यात आली; मात्र तरीही काही बेशिस्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागी तसेच गटार व पऱ्हे, नाल्यातून कचरा टाकला जात आहे. पालिकेने काही वर्षांपूर्वी शहर कचराकुंडी मुक्त केले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी कचऱ्याची विल्हेवाट व विस्थापनासाठी प्रकल्पदेखील उभारला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular