27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...

कोत्रेवाडी कचरा प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा…

कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारा डंपिंग...

शाळा, महाविद्यालयांना वाढीव अनुदान द्या, आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक...
HomeKokanवादळसदृश्य परिस्थितीमुळे आंबा बागायतदार धास्तावले

वादळसदृश्य परिस्थितीमुळे आंबा बागायतदार धास्तावले

वातावरणामध्ये होणाऱ्या सततच्या बदलामुळे स्थानिक फळ पिकांवर त्याचे दुष्परिणाम झालेले दिसून येत आहेत.

थंडीचा हंगाम सध्या हळूहळू सुरु होत आहे. पण त्यामध्ये देखील नियमितता दिसून येत नाही आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीचे संकट राज्यावर घोंघावतच आहे. वातावरणामध्ये होणाऱ्या सततच्या बदलामुळे स्थानिक फळ पिकांवर त्याचे दुष्परिणाम झालेले दिसून येत आहेत. सध्या समुद्रात देखील वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने, आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

यंदाच्या आंबा हंगामाच्या दृष्टीने चाहूल लागली असतानाच आता पुन्हा किनारपट्टी भागात वादळामुळे हवामान बदलाची शक्यता निर्माण झाली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस आणि ढगाळ  वातावरण निर्माण झाल्यास झाडांवर किड रोगाचा प्रादुर्भाव वाढून फवारणीमध्ये वाढ करावी लागण्याची समस्या आंबा बागायतदारांना सतावून सोडत आहे.

मागील दोन वर्षे तरी समुद्री वादळांमुळे किनारपट्टी भागातील नागरिकांसह येथील आंबा, काजू, कोकम आदी पिकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी झालेल्या तौक्ते वादळाची भयानकता स्थानिकांनी चांगलीच अनुभवली होती. त्यातच अधूनमधून किनारी भागातील बदलत्या वातावरणाचा अनुभव शेतकऱ्यांना येतो. अलीकडच्या काही वर्षांत आंबा, काजू पीक निसर्गाच्या बदलत्या स्थितीमुळे अडचणीत सापडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कधी थंडी तर कधी उकाड्याने अवकाळी पावसाची शक्यता असे वातावरणात बदल जाणवत असतात. वातावरण बदलाचा सातत्याने आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडतात. यंदाच्या आंबा, काजू हंगामाची चाहूल लागत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनी फवारणीचे नियोजन सुरू केले आहे. त्यातच आता समुद्री वादळाचे पडसाद येथे उमटण्याची शक्यता असल्याने बागायतदारांची चिंता वाढवणारी बाब ठरली आहे. त्यामुळे वातावरणाच्या लपाछपीमुळे नक्की काय घडते या चिंतेत बागायतदार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular