मालवण ‘राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात ठेकेदार, अधिकारी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी चिपळूण मधील व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत लेखी निवेदन त्यांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांना सादर करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणं राजकोट किल्ल्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा चार दिवसांपूर्वी कोसळला. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. राज्यात ठिकठिकाणी या घटनेचा निषेधं तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
प्रत्येक ठिकाणी त्याचे पडसाद उमटत असून चिपळूणमध्ये देखील शिवप्रेमी व सर्वसामान्य नागरिक देखील संताप व्यक्त करत आहे. या संदर्भात चिपळूण मधील व्यापाऱ्यांनी देखील आग्रही भूमिका घेतली आहे. माजी नगरसेवक जेष्ठ व्यापारी शिरीष काटकर यांच्या नेतृत्वाखाली चिपळूणमधील व्यापारी एकत्र आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक्रासमोर नतमस्तक होत महाराज आम्हाला माफ करा आशा शब्दात त्यांनी अक्षरशः राजेंची माफी मागितली. आणि घोषणा देत थेट तहसीलदार कार्यालयावर पोहचले.
यावेळी शिरीष काटकर यांच्या बरोबर अरुण भोजने, बाळा कदम, लियाकत शहा, संदीप लंवेकर, विलास चिपळूणकर, संजय तांबडे यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते. या संपूर्ण प्रकल्पात जे कोण दोषी असतील, मग ते ठेकेदार असो, पोट ठेकेदार असो, शिल्पकार असो, किंवा अभियंते सल्लागार असो, अथवा एखादा राजकारणी असला तरी, कोणालाही अजिबात दुर्लक्ष न करता कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही चिपळूणमधील व्यापाऱ्यांची भूमिका असून प्रशासन व सरकारने त्याची दखल घ्यावी आशा शब्दात शिरीष काटकर व बाळा कदम यांनी भूमिका स्पष्ट करून तहसीलदार प्रवीण लोकरे याना तसे निवेदनं सादर केले.