जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागात ३२ लाखांची अद्ययावत उपकरणे रोटरी क्लबतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बालकांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या उपकरणांचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमाला रोटरी प्रांत ३१७० चे प्रांतपाल नासीर बोरसादवाला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, रोटरी प्रांतपाल स्वाती हेरकल, माजी प्रांतपाल संग्राम पाटील, रोटरी क्लब ऑफ सांगलीचे प्रमुख दाते किशोर लुल्ला, रोटरी क्लब ऑफ मिडटाउनचे मल्लिकार्जुन बड्डे, धर्मेंद्र खिलारे आणि विलास सुतार, डॉ. विकास कुमरे आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीकांत भुर्के, माजी अध्यक्ष राजेंद्र घाग प्रमुख उपस्थित होते.
त्यानंतर हॉटेल सिल्व्हर स्वॅन येथे देणगीदारांचा कृतज्ञता सोहळा झाला. त्यात उद्योजक दीपक गद्रे, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन अध्यक्ष बिपिनचंद्र गांधी, स्वप्नाली करे, मनोज मुनिश्वर, क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भुते, असिस्टंट गव्हर्नर डॉ. केतन चौधरी, लायन्स क्लब सचिव संजय पटवर्धन प्रमुख उपस्थित होते. तसेच रोटरीचे रूपेश पेडणेकर, नीलेश मुळे, सचिन सारोळकर, देवदत्त मुकादम, विनायक हातखंबकर, धरमसी चौहान आदींसह पदाधिकारी, रोटरीचे सदस्य उपस्थित होते. सचिन सारोळकर यांनी या प्रकल्पाचा प्रवास मांडला. वेदा मुकादम, माधुरी कळंबटे आणि नीता शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव प्रमोद कुलकर्णी यांनी आभार मानले.
अमेरिकेतील रोटरी फाउंडेशनचाही वाटा – रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने ही सर्व उपकरणे दिली असली तरी त्यामध्ये अमेरिकेतील रोटरी क्लब नोवी, अमेरिका, रोटरी फाउंडेशन यांचाही मोलाचा वाटा आहे. प्रांतपाल नासीर बोरसादवाला आणि स्वाती हेरकल यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फुले यांच्याबरोबर सर्व उपकरणांची पाहणी केली.