30.2 C
Ratnagiri
Monday, January 5, 2026
HomeRatnagiriरत्नागिरी पावसमधून पहिली हापूस आंब्याची पेटी दाखल...

रत्नागिरी पावसमधून पहिली हापूस आंब्याची पेटी दाखल…

पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत २१ हजार रुपये इतकी आहे.

पुण्यात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून ही पहिली हापूसची पेटी दाखल झाली असून या पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत २१ हजार रुपये इतकी आहे. पिकलेला आंबा एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी गुरुवारी दाखल झाली. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हंगाम ातील पहिला आंबा दाखल होताच त्याची विधीवत पूजा पार पडली आहे. यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे.

पहिला आंबा देवाचा – विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी २१ हजार रुपयांना विकली गेली आहे. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्याने ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत. पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देवगडमधून हापूस आंब्याच्या मोजक्या पेट्यांची आवक सुरू झाली होती.

या वर्षीही डिसेंबरपासून आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली होती. ही आवक अशीच होत राहील, अशी अपेक्षा होती. मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने सध्या बाजारात आंबा पाहायलाही मिळत नाही. हीच परिस्थिती यापुढे कायम राहिल्यास मार्चनंतरच हापूस आंब्याची आवक होईल, असे घाऊक व्यापारी सांगत आहेत. सामान्य लोकांना तोपर्यंत आंबा चाखण्यासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

निसर्गाचा फटका – डिसेंबरमध्ये कोकणातील हापूस आणि मलावी देशातील आंबे बाजारात येत होते. परंतू अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जो काही आंबा येणे अपेक्षित होता, तो आता बाजारात न आल्याने सध्या बाजारात आंबे पाहायला मिळत नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular