केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणीव व भान ठेवून इन्फिगो ग्रुप जिल्ह्यात कार्यरत आहे. त्यांची आरोग्यविषयक चळवळ कौतुकास्पद अशीच आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात त्यांनी उभारलेली आरोग्य सुविधा हो सामाजिक जाणीव म्हणूनच उभारली आहे. त्यांचे हे काम निश्चितच वाखाण्याजोगे असल्याचे कौतुक राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या लांजातील अत्याधुनिक बाह्यरुग्ण विभागाचा (थ्री डी आय क्लिनिक) भव्य शुभारंभ राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते गुरुवारी पार पडला. आमदार राजन साळवी यांनीही सदिच्छा भेट देऊन इन्फिगोच्या आरोग्य सेवेच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मत व्यक्त करताना उदय सामंत यांनी इन्फिगोच्या उपक्रमांचे कौतुक केले.
इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.सुरुवातीला इन्फिगोच्या लांजा क्लिनिकचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. आमदार राजन साळवी यांनी यावेळी शुभेच्छापर बोलताना सांगितले की, कोकणातील विशेषतः जे रत्नागिरी जिल्ह्यातील इन्फिगोच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. या हॉस्पिटलने येथील आरोग्य व सुविधा जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यांनी उभारलेली ही आरोग्य चळवळ निश्चितच वाखाण्याजोगी आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला तहसीलदार प्रमोद कदम, नगराध्यक्ष मनोहर बाईत, न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये, संचालक महंमद रखांगी
लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शुभारंभ कार्यक्रमाला गुरुप्रसाद देसाई, चंद्रकांत परवडी, विलास दरडे, प्रसाद भाईशेट्ये, महेश सप्रे, नितीन कदम, हनीफ नाईक, सुभाष कुरुप, नगरसेवक सचिन डोंगरकर, नगरसेविका वंदना काटगाळकर, मधुरा बापेरकर, सोनाली गुरव, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अविराज पाटील, आगार व्यवस्थापिका सौ. पेडणेकर, लीला घडशी, दुर्गेश साळवी, सुभाष गुरव, संदीप सावंत, आत्माराम सुतार आदींसह तालुक्याच्या सर्व स्तरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सौ. श्रुती ठाकूर, क्लस्टर हेड दीपक इंदुलकर, मंगेश पावसकर, प्रितेश गुरव, सुशांत पांचाळ, आवेश नाईक, सायली पंडित, अंजली लिमये आदींनी मेहनत घेतली.