23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurजोरदार शक्तीप्रदर्शन करत किरण सामंतांचा अर्ज सादर

जोरदार शक्तीप्रदर्शन करत किरण सामंतांचा अर्ज सादर

भागृहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आगमन झाले आणि शिवसैनिकांच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

गुरुपुष्यामृत योग साधत गुरुवारी राजापुरात महायुतीचे उमेदवार किरण तथा भैय्या सामंत यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. राजापुरात जणूकाही भगवा जनसागर लोटला असे वातावरण पहायला मिळत होते. भैय्या सामंत यांच्या या भव्य रॅलीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेदेखील सहभागी झाले होते. सर्वत्र भगवामय वातावरण पहायला मिळाले.

सकाळपासूनचं कार्यकर्त्यांची रिघ – किरण सामंत यांचा अर्ज सादर करण्यासाठी गुरुवारी सकाळपासूनच राजापूरात संपूर्ण तालुक्यासह लांजा आणि साखरपा येथील शिवसैनिकांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. म हामार्गावर शिवसैनिकांच्या गाड्यांचे ताफेच्याताफ धावताना पहायला मिळत होते तर रस्त्यावर गळ्यात दुपट्टे घालून आले होते.

गोव्याचे मुख्यमंत्री दाखल झाले – महायुतीतर्फे किरण सामंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. भाजपकडून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत हे जातीनिशी उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री येणार म्हणून पोलिसांची अधिकच तारांबळ उडाली. सभागृहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आगमन झाले आणि शिवसैनिकांच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

महायुतीचे सरकार येणार – कोकणच्या विकासात महायुतीचा मोठा वाटा आहे. आजवर जो काही विकास झाला तो महायुतीच्या माध्यमातून झाला आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय याचे मी जाहीर कौतुक करतो. सर्वांनी एकदिलाने काम करा, सरकार हे आपलेच येणार आहे असे आवाहन यावेळी मार्गदर्शन करताना गोव्याचे मुख्यमंत्री ना. प्रमोद सावंत यांनी केले.

वाहतूक कोंडीचा फटका – एकाचवेळी दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक राजापुरात दाखल झाल्याने राजापूर शिवाजीपथ तसेच मुख्य मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा फटका गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत यांना सहन करावा लागला. सुरूवातीला डॉ. प्रमोद सावंत यांच्या गाड्यांचा ताफा सभास्थळाकडे जायला निघाला होता. मात्र अरुंद रस्ते आणि दोन्ही बाजूने रस्त्यात मधोमध उभ्या असलेल्या गाड्या यामुळे आपला ताफा मध्येच थांबवून डॉ. प्रमोद सावंत यांनी चालत जाणे पसंत केले. त्यांच्या मागोमाग उद्योगमंत्री उदय सामंत हेदेखील चालतच सभास्थळी पोहोचले.

अनेकांची उपस्थिती – शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातर्फे किरण सामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार रविंद्र फाटक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिल्पा मराठे, उद्योजक आर. डी. सामंत, राष्ट्रवादीचे बंटी वणजू आदी उपस्थित होते.

किरण सामंत दुचाकीवरून आले – राजापुरात झालेली तोबा गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त काढला होता. तो मुहूर्त साधण्यासाठी किरण सामंत हे स्वतः दुचाकी चालवत प्रांताधिकारी कार्यालयात दाखल झाले.

RELATED ARTICLES

Most Popular