26.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriलांज्यात विहिरीत पडून चाकरमानी तरुणीचा मृत्यू

लांज्यात विहिरीत पडून चाकरमानी तरुणीचा मृत्यू

माधुरी ही गणेशोत्सवासाठी आई- वडील व बहीण यांच्या समवेत मुंबई येथून कुर्णे गुरववाडी येथे आली होती.

गणेशोत्सवात अनेक चाकरमानी आपली कुटुंबासह गावच्या गणपतीच्या दर्शनासाठी कोकणांत दाखल झाले होते. त्यानंतर अनेकांचा परतीचा प्रवास देखील सुरु झाला. आणि मुंबई पुणे येथील नागरिक आपापल्या घरी देखील पोहोचले.

अनेक चाकरमानी अद्यापही परतले नसून गावाकडच्या वातारणात रमले आहेत. परंतु अनेक वेळा गणेशोत्सवामध्ये विसर्जनाच्या वेळी अनेक दुर्घटना घडतात. तर काही वेळा नकळत अशा घटना घडतात. विहिरीवर पाणी भरताना तोल जाऊन पडलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कुर्णे गुरववाडी ता. लांजा येथे शनिवारी सकाळी ८ वाजता घडली. माधुरी ही गणेशोत्सवासाठी आई- वडील व बहीण यांच्या समवेत मुंबई येथून कुर्णे गुरववाडी येथे आली होती. ती शनिवारी सकाळी ७.४५ वाजता पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. विहिरीवर पाणी भरत असतानाच तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली.

माधुरी मनोहर गुरव वय २८ असे या तरुणीचे नाव असून, ती गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबासोबत गावी आली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परत न आल्याने वडिलांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना विहिरीत पडल्याचा संशय आला. त्यांनी विहिरीकडे जाऊन आरडाओरडा केला असता ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या माधुरीला बाहेर काढले. मात्र, बराच उशीर झाल्याने तिचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता.

पोलीस पाटील राजेश मोरे यांनी या घटनेची लांजा पोलिसांना माहिती दिली. लांजा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील, नासिर नावळेकर हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular