30.2 C
Ratnagiri
Monday, January 5, 2026
HomeRatnagiriमनरेगा - एक आशेचा किरण

मनरेगा – एक आशेचा किरण

कोरोनाच्या महामारीमुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. अनेक जणांच्या नोकरी गेल्या, अनेकांचे उद्योग व्यवसायधंदे लॉकडाऊनमुळे बंद पडले. पण अशा आर्थिक संकटाच्या काळामध्ये कमवायचे कसे आणि कुटुंब पोसायचे कसे असा प्रश्न सर्व सामान्य जनतेसमोर पडला आहे.

गेल्या ३ महिन्यापासून केंद्र शासनाची योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. या योजनेची अमलबजावणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे करण्यात आली. मागेल त्याच्या हाताला काम हे योजनेचे ब्रीदवाक्य आहे. जे बेरोजगार आहेत, त्यांना काम उपलब्ध व्हाव, अर्थार्जन होण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन यंत्रणेने कसून मेहनत घेतली आणि विविध प्रकारची चारशेहून अधिक कामे या तीन महिन्यांमध्ये केली. त्यामधून ७ हजार २८० दिवसांची मनुष्यदिन निर्मिती करून, २३ लाख २ हजार ९६० रुपयांचा खर्च झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

सर्व सामान्यजनतेला या हालाखीच्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी शासनाने कामे करण्यास मंजुरी दिली होती. या योजने अंतर्गत मंजुरीसाठी नोंदणी केल्यावर एक जॉबकार्ड दिले जाते, त्यामागे फक्त त्या  व्यक्तीला नियमित रोजगार मिळण्याची व्यवस्था हाच एक उद्देश आहे. लॉकडाऊन मुले गळून पडलेल्या संसाराला आणि हातभार लागल्याने निराशेतून काहीतरी सकारात्मकतेकडे घडत असल्याची आशा पल्लवित झाली. नाहीतर दैनंदिन खर्च सुद्धा गेल्या वर्षापासून भागताना सर्व सामान्य जनतेला कठीण झाले होते. पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि कृषी विभागा अंतर्गत हि योजना जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular