29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKokanमहाराष्ट्रात पुन्हा उष्म्याची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा उष्म्याची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा

कोकण किनारपट्टी भागात बहुतांश शहरांमधील कमाल सरासरी तापमान ४० ते ४१ अंशांवर जाणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा विरळ झाल्यानंतर मंदावलेल्या वार्‍याच्या वेगाने उष्णतेच्या तीव्र लहरींनी कोकण व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे मार्च अखेरसह एप्रिल महिन्याचा उकाडा असह्य होण्याच्या मार्गावर आहे. या कालावधीत वातावरण कोरडे होणार असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी भागात बहुतांश शहरांमधील कमाल सरासरी तापमान ४० ते ४१ अंशांवर जाणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

त्यामुळे गेल्या आठवड्यात असलेले मळब दुसर्या दिवशी दूर झाले असून आगामी तीन दिवस तापमानात वाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्यात दिनांक २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने इशारा दिला असून,  उष्माघाताचा धोका असल्याचे देखील कळवले आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशी महत्वाची सूचना राज्यस्तरावरुन देण्यात आली आहे.

तहान लागली नसल्यास देखील पाणी जरूर प्यावे. दुपारी १२.३० ते ३.३० पर्यंत उन्हात फिरू नये. बाहेर जाताना छत्री, टोपी, गॉगल, पाण्याची बाटली सोबत असावी. उघड्या डोक्याने फिरू नये. उष्णतेची तीव्रता एवढी अधिक आहे कि, चक्कर येण्याची शक्यता आहे. योग्य प्रमाणात ताक,दही, लिंबू पाणी, नारळ पाणी, कोकम सरबत, उसाचा रस अशी शीत पेय प्यावीत. भर उन्हात श्रमाची कामे करू नये. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी. व शक्यतो कामा शिवाय घराबाहेर पडू नये अशा सुचना रत्नागिरी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular