मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणणाऱ्या आ. शेखर निकम यांनी राज्यात आता निधीचा विक्रम केला आहे… फक्त आणि फक्त एकाच कामासाठी कोणालाही न मिळालेला २५१५ योजनेतुन सव्वा कोटींचा निधी मुस्लिम समाजाच्या सभागृहाला आणि संरक्षकभिंतीला उपलब्ध करून देण्याचा नवा विक्रम राज्यात केला असून मुस्लिम समाज मुख्यप्रश्न मार्गी लावल्याने मुस्लिम समाजबाधवांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या हक्काचे भव्य आणि अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती मुस्लिमसमाजकडून होत आहे. या सभागृहाला आणि सभागृहालगत बांधावी लागणारी संरक्षकभिंत या साठी मोठ्या प्रमाणात निधीची आवशक्यता होती. समाजाच्यावतीने आ. शेखर निकम यांना या निधीसाठी निवेदन देण्यात आले होते मात्र एवढा मोठा निधी आणून देण्याचा शब्द आ निकम यांनी दिला होता.
आ. निकमांचे कसब पणाला – खरे तर एवढा निधी एक रकमी मिळणे अवघड होते. त्यात सध्या निधीची अडचण, त्यामुळे कोणत्या योजनेतून हा निधी आणता येईल का याचा विचार सुरू झाला. एक रकमी निधी आणणे अवघड असताना आ. निकमानी आपले कसब पणाला लावले. सतत पाठपुरावा सुरू केला आणि निधीचा मार्ग सापडला.
१ कोटी २५ लाख – २५१५ योजनेतून १कोटी २५ लक्ष एवढा निधी आ. शेखर निकम यांनी आणला. यामध्ये संरक्षकभिंत आणि सभागृह बांधण्यात येणार आहे. या निधीने सुसज्ज आणि आलिशान सभागृह उभे करण्याचा निर्णय मुस्लिम सम राजबांधवांनी घेतला आहे. एक मोठी समस्या आ. निकम यांनी मार्गी लावली आहे. त्यामुळे समाज बांधवांचे हक्काचे सभागृह उभे राहणार असून आ. निकम यांनी मुस्लिम समाजाला दिलेला शब्द निधी उपलब्ध करून पूर्ण केला आहे. खरे तर २५१५ या योजनेतून विकासकामे केली जातात मात्र २५ लाखाच्या पुढे निधी एका कामासाठी मिळत नाही मात्र आ शेखर निकम यांनी या योजनेतून तब्बल एक कोटी पंचवीस लाख एवढा निधी मिळवला आणि अशा पद्धतीने निधी मिळवणारे आ शेखर निकम हे राज्यात एकमेव आमदार ठरले आहेत.
मुस्लिम समाजात उत्साह – माजी खा. स्व. गोविंदराव निकम यांच्या पासून निकम परिवाराचे मुस्लिम समाज बांधवांशी एकोप्याचे संबंध आहेत. स्व. गोविंदराव निकम यांच्या नंतर आ शेखर निकम यांनी पूर्वीचे स्नेहाचे संबंध आता पुढे चालवले आहेत. या स्नेहातूनच आ निकमानी बाजी लावत निधी मंजूर केल्याने संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.. बरोबर आ. निकम यांच्याबाबत आदर ही समाजामध्ये वाढला असल्याचे दिसते आहे.
शब्द पूर्ण केल्याचे समाधान – या वेळी आ शेखर निकम म्हणाले की मी म ाझ्या मुस्लिम समाज बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान मिळाले असून मतदार संघात ज्या ज्या ठिकाणी विकासाचे अथवा अन्य दिलेला शब्द आपण पूर्ण केले आहेत अजून ही आपण या सभागृहासाठी अवशक्य ते सर्वोत्तपरी सहकार्य करू असे निकम म्हणाले.