अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याची मुंबईतील तसेच खेडमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी लिलाव पुकारण्यात आला होता. मात्र त्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणीही फिरकले नाही. त्यामुळे या मालमत्तांचा भविष्यात पुन्हा लिलाव करू असे सफेमा कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे. खेड रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यातील मुंबके या गावातील दाऊदच्या वडिलोपार्जित शेत जमीन तस्कर आणि परकीय चलन हाताळणी (मालमत्ता जप्त) कायदा (सफेमा) आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकरणाच्या कार्यालयाने विक्रीसाठी ठेवलेल्या ९ मालमत्तांपैकी एक होती. हा लिलाव सक्षम अधिकारी सुरभी शर्मा यांच्या देखरेखीखाली पार पडला. परंतू बोली लावणारा कोणी पुढे आलाच नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. सफेमा अधिकाऱ्यांच्या मते, खेड-मुंबके येथील चार भूखंड दाऊदची आई अमिना बी यांच्या मालकीचे होते नंतर ते हसीना पारकरला हस्तांतरित केले. त्यापैकी या मालमत्ता ५ जानेवारी २०२४ रोजी लिलाव करण्यात आल्या ज्यामध्ये दोन मालमत्ता या १७३० चौरस मीटरचा भूखंड होता.
त्या राखीव किंमतीला १.५६ कोटीला राखीव किंमतीला विकल्या गेल्या. आणि १७१ चौरस मीटरचा भूखंड ज्याची किंमत १५४४० रुपये एवढी होती. दिल्लीस्थित एक वकील अजय श्रीवास्तव यांनी पहिल्या भूखंडासाठी ३.२८ लाख रुपये आणि छोट्या भूखंडासाठी २.०१ कोटी रुपये त्याची राखीव किमतीच्या १३०० पट जास्त बोली लावली होती. नंतर श्रीवास्तव यानी जास्त बोली आहे लहान भूखंडाची विक्री रद्द केली. पण १०४२० चौरस मीटर (९.४ लाख रुपये राखीव) आणि ८९५३ चौरस मीटर (८ लाख रुपये राखीव) असलेले दोन मोठे भूखंड विक्रीला राहिले नाहीत. मंगळवारी झालेल्या लिलावात, ते ३ न विकलेले भूखंड आणि अतिरिक्त २२४० चौरस मीटर कृषी पार्सल (राखीव किंमत २.३ लाख रुपये) पुन्हा ऑफर करण्यात आले, यावेळी राखीव किमतीत ३० टक्के पर्यंत कपात करण्याची नवीन अट होती. जर सर्व चारही भूखंड विकले गेले असते, तरे अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार सुमारे २० लाख रुपये मिळू शकले असते. पण कोणी लिलावाला पुढे आलाच नाही.
इतर मालमत्तांमध्ये, रायगडमधील काशीद गावातील दोन शेती भूखंड ज्यांचे एकूण राखीव मूल्य ११.०६ कोटी रुपये होते आणि ४.०९ कोटी रुपये किंमतीच्या १०५०० चौरस मीटर जमिनीचा लिलाव करण्यात आला. महागड्या भूखंडांना कोणीही खरेदीदार मिळाला नाही, तर काशीदमधील एका रहिवाशाने ४.०९ कोटी रुपयांचा भूखंड राखीव किंमतीला खरेदी केला. अंधेरी (पश्चिम) येथील २०.१५ चौरस मीटरचा फ्लॅट, जो ड्रग्ज प्रकरणात जप्त करण्यात आला होता, त्याला अनेक बोली लागल्या आणि ६६ लाख रुपयांच्या राखीव रकमेतून १.०१ कोटी रुपयांना विकण्यात आले. परंतु सुरतमधील आणखी एक फ्लॅट, जो १५१.०६ चौरस मीटरचा होता आणि तस्करी प्रकरणात जप्त करण्यात आला होता, तो ६० लाख रुपयांच्या राखीव किंमतीनंतरही खरेदीदारांना आकर्षित करू शकला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

