29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriरत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

ही महिन्यांपूर्वी रत्नागिरीत असाच प्रकार एमआयडीसी परिसरातही घडला होता.

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी मातोश्री नगर येथे उपयुक्त पाळीव प्राण्याचे मुंडके छाटलेल्या स्थितीत अवयव सापडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रात्री ८:३० वा. च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी याठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस हजर झाले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर पाळीव प्राण्याचे छाटलेले मुंडके व पायघ आढळून आले. हा नेमका प्रकार काय याबाबत सर्वत्र कुजबूज सुरू झाली. लोकांनी वेगवेगळे अंदाज लावण्यास सुरुवात केली. काही वेळातच हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी जाऊन पोहोचले. घटनास्थळी गोरक्षक विशाल पटेल याच्यासह अन्य गोप्रेमीही दाखल झाले. हे अवशेष नेमके कोणत्या प्राण्याचे आहेत याचा शोध घेतला जात होता. संतप्त नागरिकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत केले व याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल, असे यावेळी सांगितले. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात गर्दी कायम होती. काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीत असाच प्रकार एमआयडीसी परिसरातही घडला होता.

RELATED ARTICLES

Most Popular