28.9 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriडेपोतून प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी

डेपोतून प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी

एस.टी कर्मचार्यांच्या राज्यव्यापी सुरु असणाऱ्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत. वाहतुकीचे साधनच उपलब्ध नसल्याने अनेकांची कामे खोळंबली असून, खाजगी वाहनाने चढ्या दराने होणारी वाहतूक परवडणारी नाही. अनेक रुग्णांचे सुद्धा उपचारासाठी निघाले असताना अचानक संप जाहीर केल्याने ताटकळत राहावे लागल्याने हाल झाले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने खासगी वाहतुकीला आगारातून वाहतूक करण्याची परवानगी देणारे परिपत्रक  प्रशासनाकडून मंगळवारी जारी केले आहे.

जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी आपत्ती व्यवस्थापन नियम २००५ चे कलम ३० अंतर्गत हे परिपत्रक जारी केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या ९ एसटी डेपोमध्ये प्रवाशांची वाहतुक करण्यासाठी परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ व पोलीस विभाग यांचे समन्वयाने प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सर्व खाजगी बसेस, स्कुल बसेस, मालकीच्या बसेस आणि मालवाहु वाहने यांना डेपोतून प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी दिली आहे.

ही सुट केवळ दि.०८/११/२०२१ च्या मध्यरात्रीपासून प्रस्तावित संप ज्यावेळी संपवण्यात येईल, त्यावेळी सदर अधिसुचना रद्द समजण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. याकामी प्रवाशांसाठी वाहतुक व्यवस्था सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग, एसटी महामंडळाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील ९ बस डेपो मॅनेजर यांचेशी संपर्क साधून त्यांच्या आवश्यकतेनुसार खाजगी बसेस, कंपनी बसेस, स्कुल बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या आपत्कालीन कालावधीमध्ये वाहनधारकांकडून अवाजवी भाडे अथवा प्रवाशांची अडवणुक केली जाणार नाही यावर देखील संबंधित अधिकाऱ्यांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येत आहे. असेही या पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular