कोरोंना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने काल मध्यरात्री जाहीर केला. त्या संदर्भात नियमावली देखील प्रसिद्ध केली या नियमावलीनुसार येत्या सोमवारपासून अर्थात सात जून पासून महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात अनलॉक होणार आहे.
आपल्या रत्नागिरी जिल्हा या नियमावलीमध्ये चौथ्या टप्प्यामध्ये मोडतो. ज्या जिल्ह्यांचा कोरोंना पॉझिटिव्हिटी रेट हा १० ते २० टक्के आहे त्या सर्व जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात झाला आहे यामध्ये आपल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांचा समावेश आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोमवारपासून चौथा टप्पा हा नक्की कशा प्रकारे असणार आहे याची आपण माहिती घेऊ. सद्यस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ तारखेपर्यंत हा कडक लोकडाऊन चालू आहे.
अनलॉक चार चा टप्पा कसा असेल?
- सोमवार ते शुक्रवार पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू असतील
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील
- चित्रपटगृहे, मॉलस पूर्णपणे बंद राहतील
- सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते ९ वेळात उद्याने, मैदाने चालू राहतील.
- अत्यावश्यक सेवेतील खासगी कार्यालयात देखील केवळ २५% उपस्थिती राहील
- शासकीय कार्यालयात देखील २५% उपस्थितीच राहील
- कोणत्याही सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्याला परवानगी नाही
- लग्नसोहळ्यासाठी फक्त २५ लोक उपस्थितीत राहतील
- अंत्यविधीसाठी फक्त २० लोक उपस्थितीत राहतील
- राजकीय बैठका ५०% उपस्थितीत राहील
- ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय आहे त्या ठिकाणी बांधकाम व्यवसायिकांना बांधकामासाठी परवानगी दिली आहे
- शेतीविषयक कामे सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यास परवानगी
- ई-कॉमर्स अथवा कुरियर सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठी उपलब्ध.
🚨Level of restrictions for breaking the chain 🚨 pic.twitter.com/Vi8WvkDuqi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2021
रत्नागिरी जिल्हा हा अनलॉक च्या चौथ्या टप्प्याच्या नियमावलीत बसल्यामुळे वरील निर्बंध हे आता जिल्ह्याला सोमवारपासून लागू झालेले आहेत.रत्नागिरीमध्ये दोन जूनच्या मध्यरात्रीपासून जी कडक संचारबंदी नऊ जून पर्यंत लावण्यात आलेली आहे त्यानंतर देखील शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत अनलॉक चारच्या नियमावली जिल्ह्यास बंधनकारक राहतील असेच दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक रत्नागिरीकरांने शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे जेणेकरून रत्नागिरी जिल्हा हा लवकरात लवकर कोरोंना मुक्त होऊ शकेल.