25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunमहामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांवर विक्री, वाहतूकीची कोंडी

महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांवर विक्री, वाहतूकीची कोंडी

सावर्डे येथे मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा अनधिकृतपणे टेम्पो व हातगाड्या उभ्या करून विविध पदार्थांची विक्री केली जात आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या सावर्डे भागामध्ये चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या निमित्त डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजू असलेले बांधकाम आणि टपऱ्या पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आल्यात. रस्ता पूर्णपणे मोकळा करण्याचे काम सुरू असताना ज्या ज्या ठिकाणी रस्ता मोकळा झालेला आहे, तेथे फळ विक्रेते ठाण मांडताना दिसत आहेत. सोबतच कांदा लसूणच्या गाड्या, भाजीच्या गाड्या आणि मच्छी विक्रेते सुद्धा रस्त्यावर वाहने उभे करून आपला व्यवसाय करताना दिसत आहेत. बाजारभावाच्या तुलनेत कमी किमतीमध्ये वस्तू मिळत असल्याने, खरेदीसाठी ग्राहकांची देखील सुंबड उडत असल्याचे चित्र दिसते आहे. मात्र त्यामुळे महामार्ग असल्याने पाठून येणारी वाहने थांबलेल्या वाहनास धडकून अपघात घडण्याच्या घटना घडत आहेत.

सावर्डे येथे मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा अनधिकृतपणे टेम्पो व हातगाड्या उभ्या करून विविध पदार्थांची विक्री केली जात आहे. या वस्तूंच्या खरेदीसाठी महामार्गावरुन जाणारी वाहने अचानक थांबल्याने महामार्गावर किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस या दुकानांचा अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्‌भवत आहे.

महामार्गालगत बसून विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते सुरक्षततेची कुठलीही काळजी घेत नसल्याने अपघाताच्या घटना घडताना दिसून येत आहे. यामुळे महामार्गावरून वेगात येणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटल्यास या विक्रेत्यांचाही त्यामध्ये बळी जाण्याची शक्यता निर्माण होते. तसेच वस्तूंची विक्री करणाऱ्याकडे कुठलीही परवानगी व परवाने नाहीत ते कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर देखील भरत नाहीत. तरी देखील त्यांच्यावर कोणीच कारवाई का करत नाहीत असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. तसेच संध्याकाळच्या वेळी हे विक्रेते कमी किमतीत वस्तूंची विक्री करत असल्याने प्रवासी गर्दी करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular