“रत्नागिरी मतदार संघातील ना. उदय सामंत हे या घडीला एकमेव असे नेते आहेत की जे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होतील, भक्कम निधी आणू शकतील व ‘चौफेर’ विकास वेगाने मार्गस्थ करतील. ते सुसंस्कृत, सृजनशील व सचोटीचे नेते असल्याने त्यांना सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने निवडून आणावे व आपला ‘हक्काचा आमदार’ विधानसभेत पाठवावा” असे सडेतोड आवाहन श्री. राजाभाऊ लिमये यांनी केले. श्री. राजाभाऊ लिमये हे कोकणातील एक ज्येष्ठ नेते असून ते रत्नागिरी जि. प. चे यशस्वी अध्यक्ष म्हणून ओळखले जातात.
भावी पिढ्यांसाठी आवश्यक ! – श्री. राजाभाऊ लिमये यांनी सांगितले, “रत्नागिरी मतदार संघात या घडीला एकाच वेळी अनेक विकास कामे सुरु आहेत. त्यामुळे काहीशी गैरसोय झाल्याचे नागरिकांना वाटते, परंतु ही कामे आज ना उद्या होणे आवश्यक आहे आणि ती एकदा का झाली की मग संपूर्ण मतदार संघाचा चेहरामोहरा बदलून जाईल. भविष्यासाठी व भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी ही विकास कामे आवश्यक होत” असे त्यांनी सडेतोड शब्दात सांगितले.
संधीचे ‘सोने’ केले ! – त्यांनी पुढे सांगितले, “ही एकाच वेळी सुरु असलेली विविध क्षेत्रातील विकास कामे जेव्हा निधी उपलब्ध होतो तेव्हाच हाती घेतली जातात. सुदैवाने ना. उदय सामंत यांनी झटपट निधी आणला व सर्व कामे सुरु झाली. ना. उदय सामंत यांनी मिळालेल्या संधीचे मतदार संघाचा विकासाकरीता ‘सोने’ केले असेच म्हणावे लागेल”.
क्षमता उदय सामंतांकडे ! – “ही सर्व सुरु झालेली तसेच मंजूर झालेली कामे झपाट्याने पूर्ण होण्यासाठी तितक्याच झपाट्याने शासकीय निधी आणला पाहिजे. त्यासाठी आपला नेता हा मंत्रिमंडळात ‘कॅबिनेट’ मंत्री असायला हवा तरच भक्कम निधी आणता येईल आणि ही ‘क्षमता’ या घडीला केवळ आणि केवळ ना. उदय सामंत यांच्याकडेच आहे, ही बाब सर्व मतदार बंधू भगिनींनी ध्यानी घ्यायला हवी” असे स्पष्ट व स्वच्छ शब्दात त्यांनी सांगितले.
कॅबिनेट मंत्री होण्याची क्षमता – श्री. राजाभाऊ लिमये यांनी पुढे सांगितले की, “या घडीला रत्नागिरी मतदार संघात ना. उदय सामंत हे एकमेव नेते असे आहेत की ते निवडून येतील, मंत्रिमंडळात ‘कॅबिनेट’ मंत्री होतील, त्यांचे सर्व वरिष्ठ नेत्यांशी उत्तम स्नेहसंबंध आहेत व त्या बळावर ते मतदार संघासाठी भक्कम निधी आणू शकतील व सर्व विकास कामे मार्गी लावतील” अशा सोप्या शब्दात त्यांनी सारे स्पष्ट केले.
विश्वासपात्र नेते ! – त्यांनी पुढे सांगितले, “ना. उदय सामंत हे अत्यंत मनमिळावू व हसतमुख स्वभावाचे आहे. ते सुसंस्कृत तसेच सृजनशील व सचोटीचे नेते होत. ते पक्ष न पाहता संकटात किंवा अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून येतात. नेत्याच्या खांद्यावर विश्वासाने मान टेकवावी असे ते नेते होत. असे नेतृत्व अन्य कुणात नाही. ही बाब सर्वांनी ध्यानी घ्यायला हवी” असे त्यांनी निर्भिडपणे सांगितले.
क्षमता असणारा नेता ! – त्यांनी पुढे सांगितले, “नेता विश्वासपात्र हवा, सचोटीचा हवा, कर्तबगार हवा व विकास करण्याची क्षमता असणारा हवा. या सगळ्या निकषांचा विचार करता या घडीला ना. उदय सामंत हेच एकमेव नेते नजरेसमोर येतात. म्हणूनच मतदार संघाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विकासाची आलेली संधी साधायलाच हवी व त्यासाठी या घडीला ना. उदय सामंत हेच हवेत !” असे राजाभाऊ लिमये यांनी ठासून सांगितले.
पक्षभेद बाजूला ठेवा! – त्यांनी पुढे सांगितले की, “मी. सुमारे ८० उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत, म्हणूनच सांगतो, सारासार विचार करता सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या वेगवान विकासासाठी कृपया ना. उदय सामंत यांनाच मते देऊन विधानसभेत पाठवा व ‘कॅबिनेट’ मंत्री होऊ द्या!” अशा स्पष्ट व स्वच्छ शब्दात त्यांनी रत्नागिरी मतदार संघातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्र आवाहन केले.