23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurरिफायनरीविरोधी आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा, बारसूमध्ये येणार ॲड. सरोदे, डॉ. चौधरी

रिफायनरीविरोधी आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा, बारसूमध्ये येणार ॲड. सरोदे, डॉ. चौधरी

बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनाला आता राज्यभरातून विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. पुण्यात मंगळवार दि. ३० मे रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अँड. असीम सरोदे यांनी आपण लवकरच बारसू येथे भेट देऊन रिफायनरी विरोधी आंदोलकांशी संवाद साधणार असल्याचे आश्वासन बारसू -सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकारी यांना दिले आहे. बारसू सोलगाव पंचक्रोशीतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला विरोध डावलून शासनाने प्रशासनाच्या मदतीने प्रचंड पोलीस बंदोबस्तात माती सर्वेक्षण केले. स्थानिकांनी प्रशासनाचा मनाई आदेश झुगारून आंदोलन उभे केले. या रिफायनरी विरोधी आंदोलनाची दखल राज्यातील विविध संघटनांनी घेत आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांची गावभेट – बारसू सड्यावर रिफयनरी विरोधी आंदोलन सुरू असताना आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत विविध सामाजिक संघटनांनी निदर्शने केली होती. भारतीय लोकसत्ताक संघटना, लोक हितकारणी संस्थेच्या सौ. दिपीका आंग्रे, अमोलकुमार बोधीराज, मनिषा जाधव, किरण गमरे, श्रेयस जाधव, संदीप आंग्रे आदींनी गोवळ येथे स्थानिक शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलनाची माहिती घेतली. पुढील आंदोलन कसे करावे यासाठी मुंबईत जाहीर सभा घेऊन दिशा ठरवू आणि आम्ही आपल्यासोबत आहोत असे आश्वासनं स्थानिकांना दिले. यावेळी स्थानिकांनी त्यांचे स्वागत केले. तर स्थानिक आंदोलकांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली.

सरोदे, चौधरी बारसूत येणार – निर्भय बनो आंदोलनाची विरार येथे दि. २१ मे रोजी सभा झाली. या सभेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वम्भर चौधरी, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अँड असीम सरोदे यांनी आपल्या भाषणात बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनाचा उल्लेख करून रिफायनरी विरोधी आंदोलनास पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेतली असता अँड असीम सरोदे यांनी आपण रिफायनरी संदर्भात आंदोलकांना कायदेशीर मदत करण्यास तयार असल्याचे सांगून लवकरच आपण बारसू येथे येऊन स्थानिक जनतेशी संवाद साधणार आहोत. तुम्ही सभेची तारीख आणि वेळ निश्चित करावी असे आश्वासन बारसू-सोलगाव प्रस्तावित रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकारी यांना दिले असल्याचे सांगितले. पुण्यात ३० मे रोजी बैठक बारसू रिफायनरी विरोधात संघर्ष करणाऱ्या स्थानिक आंदोलकांना महाराष्ट्रभरातील कष्टकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या विविध जनसंघटनाचे कार्यकर्ते, लेखक, कलावंत, शास्त्रज्ञ, बुद्धिजीवी वर्गाचा पाठिंबा मि ळवण्यासाठी आणि बारसू रिफायनरी विरोधी आंदोलन महाराष्ट्रव्यापी कसे करता येईल आणि बारसू रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या बाजूने या आंदोलनाला सर्व स्तरातून भक्कम पाठिंबा कसा उभा करता येईल याची चर्चा करुन निर्णय करण्यात येणार आहे. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पुणे येथे ३० मे रोजी एस एम जोशी सोशलिस्ट फौंडेशन येथे सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular