गुहागर तालुक्यामधील झोंबडी ग्रामपंचायतची ग्रामसभा ३० मे रोजी पार पडली. या ग्रामसेवेमध्ये गावातील महिलांच्या सुरक्षेते संबंधित ठराव प्रस्तावित करण्यात आला. या ठराव मध्ये झोंबडी गावातील महिलांना असुरक्षिता वाटू नये, महिलांच्या अब्रूची व सुरक्षिततेचा विचार करून स्त्रियांच्या सुरक्षिते बाबत निर्णय घेण्यात आला. स्त्री विनयभंग करणारे, स्त्रियांच्या इज्जतीवरती हात टाकणारे, अब्रू लुटणाऱ्या, लिंग पिसाट वृत्तीच्या लोकांना गावातून हद्दपार करण्यासंदर्भात एकमुखी ठराव करण्यात आला. समाजात अशा लोकांवर बहिष्कार टाकण्यात यावा असेही ठरवण्यात आले. या ग्राम सभेमध्ये या ठरावाचे सूचक म्हणून समीना ममतुले तर या ठरावाला सुनंदा वसंत सकपाळ यांनी अनुमोदन दिले त्यानंतर हा ठराव सर्वांनु मते मंजूर करण्यात आला. झोंबडी गावातील सर्वच महिलांनी या ठरावाच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या. झोंबडी गावातील महिलांचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
तसेच यापुढे गावात अशाप्रकारचे कृत्य कोणी केल्यास तशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे. झोंबडी येथील ६० वर्षीय व्यक्तीनें आपल्याच २१ वर्षीय सुनेचा सातत्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, सुनेने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून गुहागर पोलीस स्थानकात २५ रोजी सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, ही घटना अतिशय चीड व संताप आणणारी असून या घटनांवरून व अशा प्रकारच्या व्यक्तीमुळे आपल्या गावाची बदनामी होते म्हणून झोंबडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये हा ठराव करण्यात आला. आपल्या कुटुंबातीलच महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला गावात राहण्याचा कोणताच अधिकार नाही. अशा माणसामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. तसेच गावातील महिला असुरक्षित वाटू नये म्हणून सदरील व्यक्तीला गावातूनच हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
या ग्रामसभेला सरपंच अतुल लांजेकर, उपसरपंच सौ. प्रणाली पवार, ग्रामपंचायत सदस्या मयुरी लांजेकर, ग्रामस्थ रघुनाथ तावडे, जब्बार ममतुले, संतोष लांजेकर, इस्माईल बंदरकर, विशाखा सकपाळ, नंदा शिगवण, शिम ममतुले, वासुदेव लांजेकर, खान सौ. बिस्मिल्ला बंदरकर, रोशनी सकपाळ, केशव शिरकर, संगिता आंबेकर, सिध्देश राजेंद्र घाग, निरंजन सकपाळ वैशाली लांजेकर, अमिरा ममतुले, संदीप चव्हाण, योगेश माने आदीसह महिला उपस्थित होते.