26 C
Ratnagiri
Tuesday, July 15, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeEntertainmentराणादा आणि पाठक बाईंचा खऱ्या आयुष्यात जीव रंगला

राणादा आणि पाठक बाईंचा खऱ्या आयुष्यात जीव रंगला

अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकौंटवरून या नवीन आयुष्याच्या प्रारंभाचे विशेष सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

मालिका, सिनेमामध्ये एकत्र काम करणारे अनेक कलाकार कालांतराने एकमेकांसोबत लग्न केलेली अनेक उदाहरणे डोळ्या समोर आहेत. अनेकदा जरी मालिकेमध्ये असलं तरी एकमेकांसोबत घालवलेला काळ समोरच्या व्यक्तीला ओळखण्यास पुरेसा ठरतो आणि आपोआपच मन जुळू लागतात.

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेता हार्दिक जोशी उर्फ राणादा आणि अभिनेत्री अक्षया देवधर उर्फ पाठक बाई यांनी चाहत्यांसाठी एक सुखदच धक्का दिला आहे. दोघांनी गाजावाजा न करता, नुकताच साखरपुडा पार पडला आहे. अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकौंटवरून या नवीन आयुष्याच्या प्रारंभाचे विशेष सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होत असून चाहते लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

अशिक्षित राणादा आणि शिक्षिका पाठक बाईं यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. चाहत्यांची अत्यंत आवडती जोडी बनली आहे. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या जोडीची जादू प्रेक्षकांच्या मनावर आजवर कायम राहिली आहे.

एकेकाळी  ‘तुझ्यात जीव रंगला’  या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावार अधिराज्य गाजवले. मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही त्यातील मुख्य भूमिका निभावलेली पात्र चाहत्यांच्या कायमच स्मरणात राहिली आहेत. राणादा म्हणजे हार्दिक आणि पाठक बाई म्हणजे अक्षया दोघेही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. अक्षया सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती तिचे विविध वेशातील स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

तर हार्दिकही त्याच्या नवीन मालिकेच्या कामानिमित्त नेहमीच प्रसिद्धी झोतात असतो. या दोघांच्या खास नात्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती,  पण याबद्दल दोघांनीही कधी स्पष्ट बोलले नव्हते. परंतु आता या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत नवीन नाते जगासमोर आणले आहे. या दोघांनी साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular