29.9 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

फुटबॉलचा सर्वात मोठा स्टार पुढच्या वर्षी भारतात येणार…

संपूर्ण जगाला फुटबॉलचे वेड लागले आहे. भारतातही...

गणपतीपुळे किनाऱ्यावरील ‘त्या’ भिंतींना धोका

तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे किनाऱ्यावरील मंदिर परिसराला जोडून...

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चिपळूणमध्ये, एकूण किती टक्के मतदान.. जाणून घ्या

नागरिकांच्या उत्साहामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला...
HomeMaharashtraकाय उघडायचय ते उघडा, नतर तुम्हाला उघडता उद्धव ठाकरेंची बॅग तपासताच राजकारण तापले

काय उघडायचय ते उघडा, नतर तुम्हाला उघडता उद्धव ठाकरेंची बॅग तपासताच राजकारण तापले

हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.

या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. सध्या प्रचाराचा धडाका सुरु असून प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेते महाराष्ट्रात येत आहेत. या पार्श्वभूम ीवर सोमवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील वणी या ठिकाणी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

बॅगेची तपासणी – दरम्यान, उद्धव ठाकरे हे सभेसाठी दाखल झाले. हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यांच्यासोबत आमदार मिलिंद नार्वेकरही होते. त्यांचीही बॅग तपासण्यात आली. यामुळे उद्धव – ठाकरे यांनी सभेत बोलताना, निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा देत काही सवाल विचारले. ‘तुम्ही जशी माझी बॅग तपासली, तशीच पंतप्रधान मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या का? जर निवडणूक अधिकारी त्यांच्या बॅगा तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? – मला जास्त भाषण करण्याची गरज नाही. कारण लोक सांगत आहेत की, तुम्हाला विजय दिला. फक्त २० तारखेला कोणालाही डोळ्यावर पट्टी बांधू देऊ नका, आता आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी देखील काढली. त्यामुळे तुमच्याही डोळ्यावर पट्टी असण्याची गरज नाही. तुम्ही डोळसपणे मतदान करा. मी कोणत्याही माणसांना दोष देत नाही, तर मी यंत्रणेला दोष देत आहे. मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा माझ्या स्वागतासाठी ८ ते १० जण उभे होते. मी त्यांना विचारलं की काय करायचंय? ते म्हणाले बॅग तपासायची. त्यांना म्हटलं तपासा. आता जे तुमची तपासणी करतात त्यांची १० जण उभे होते. मी त्यांना विचारलं की काय करायचंय? ते म्हणाले बॅग तपासायची. त्यांना म्हटलं तपासा. आता जे तुमची तपासणी करतात त्यांची ओळखपत्र देखील तुम्ही तपासा. तसेच ते जसे तुमचे खिसे वैगेरे तपासतात तसं तुम्ही देखील त्यांचे खिसे तपासो. हा आपला अधिकार आहे. तुम्हाला जर तपासणी अधिकाऱ्यांनी अडवलं तर तर अधिकाऱ्यांच्या ओळखपत्रासह त्यांचे खिसे देखील तपासा, हा तुमचा अधिकार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या बॅगाही तपासा – मी यंत्रणेला सांगतो, तुम्ही जशी माझी बॅग तपासली, तशीच पतंप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची बॅग तपासली का? तपासायला हवी की नको? दाढीवाल्या शिंदेंची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटवाल्यांची तपासायला हवी की नको? फडणवीसांची बॅग तपासायला हवी की नको? पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सभेसाठी येतात. मोदी आल्यानंतर रस्ते बंद होतात. मग हे रस्त्याने सुसाट जातात. मात्र, पंतप्रधान मोदी असो किंवा अमित शाह असोत किंवा देवेंद्र फडणवीस, अजित पवार असोत. यांच्या बॅगा जर निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील. मग मात्र, पोलिसांनी मधे यायचं नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी मधे यायचं नाही. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे, तसं प्रचाराला जो कोणी येईन त्याची बॅग तपासण्याचा अधिकार मतदारांना आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बॅग काय… काय उघडायचे ते उघडा, नंतर तुम्हाला उघडतो! – दरम्यान वणी येथे हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक आयोगाच्या पथकाने उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केली. त्याबाबत जाहीर सभेत माहिती देताना उद्धव ठाकरेंनी सांगितले की, मी त्यांना विचारले, तुमचं नाव काय? कुठे राहता? आत्तापर्यंत कोणाच्या बॅगा तुम्ही तपासल्या आहेत? याआधी कोणाच्या बॅगा तपासल्या. मीच पहिला गिऱ्हाईक सापडलो. तुम्ही आत्तापर्यंत फडणवीस, मिंधे, मोदी, शहा यांच्या बॅगा तपासल्यात का? माझी बॅग काय… माझा युरिन पॉटही तपासा. इंधनाची टाकी तपासा… काय उघडायचय ते उघडा, नंतर मी तुम्हाला उघडणार आहे असा इशारा देखील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular