विवाह बंधनात अडकले
अक्षया – हार्दिक
1
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्येही पती-पत्नी झाले आहेत.
2
गेल्या काही दिवसांपासून राणादा-पाठक बाईंच्या लग्नाची चांगलीच चर्चा होती.
3
हार्दिक आणि अक्षया यांच्या हळदी आणि मेहंदीच्या फोटोंनी सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला होता.
4
जांभळ्या आणि गुलाबी, पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील अक्षयाच्या मेहंदी लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.
5
या दोघांच्या संगीत कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
6
फक्त लग्नातलेच नाही तर अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाआधीच्या अनेक विधींचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.
7
अक्षया आणि हार्दिकने जून २०२२ मध्ये साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता.
8
अक्षया- हार्दिकच्या लग्नातील फर्स्ट लूक आता समोर आला आहे. पारंपरिक पेहरावात नवरदेव आणि नवरी मुलगी अगदी सुंदर दिसत होते.
9
अखेर या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं आहे. या दोघांवर त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
10