मधुमेह लक्षणे आणि  घ्यावयाची काळजी

1

मधुमेह हा वेदनाविरहित आजार आहे. त्याची लक्षणे रुग्णाला चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत.

2

मधुमेहाच्या निदानात उपाशीपोटी (फास्टिंग) आणि खाल्ल्यानंतर दोन तासांनी (पीपी) अशी दोन वेळा साखरेची चाचणी केली जाते.

3

ज्या घरांमध्ये लठ्ठपणा, डायबेटिस आधीपासून आहे त्यांनी कमी कॅलरी आणि जास्त प्रथिनं असलेला आहार घेण्यावर भर द्यावा

4

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे आजार एकच असला तरी सर्वाना एकाच प्रकारचा आहार, एकच औषध चालते असे नाही.

5

घरात इतर कुणाला मधुमेह असो वा नसो, पस्तिशीनंतर रक्तातील साखर तपासून पाहणे चांगले.

6

हृदय, डोळे, मूत्रपिंडे, मज्जातंतू, पाय हे अवयव मधुमेहात विशेष जपावे लागतात.

7

आपल्या प्रकृतीप्रमाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आहाराचे कोष्टक तयार करणे व ते काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे

8

तहान-भूक अधिक लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, रात्री उठून लघवीस जावे लागणे ही लक्षणे सहसा दुर्लक्षिली जातात.

9

जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे मधुमेहपूर्व स्थितीत फार गरजेचे.

10