किचन मॅनेजमेंट एक कला

1

स्वयंपाक करणं ही एक कला आहे. अशा काही टिप्स ज्या तुम्हाला किचनमध्ये साफसफाई ठेवण्यास मदत करतील.

2

किचनमध्येच त्या घरात राहणाऱ्या लोकांचे स्वास्थ अवलंबून असते.

3

स्वच्छ कापड व्हिनेगरमध्ये बुडवून त्याने ओटा पुसा. असं केल्याने ओट्यावर जमा झालेली घाण आणि किटाणुंचा नाश होईल.

4

किचनमध्ये ठेवला जाणारा कचऱ्याचा डबा नेहमी स्वच्छ ठेवा. त्यातील पिशवी दररोज बदला.

5

सिंक साफ करण्यासाठी आणि त्यात ग्रीस चिकटले असल्यास त्यात गरम पाणी टाका. यात तुम्ही व्हिनेगार आणि बेकिंग सोडा टाका.

6

किचनचे कॅबिनेट्स साफ करण्यासाठी व्हिनेगार आणि लिक्विड सोपचा वापर करा.

7

फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या. त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका. या मिश्रणाने फ्रीज साफ करा.

8

किचन साफ ठेवणे गरजेचे असते कारण किचन साफ ठेवले नाही तर घरातील व्यक्ती आजारी पडू शकतात.

9

किचनच्या टाईल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरला साबण लावून त्याने भिंती धुवा. टाईल्स स्वच्छ होतील

10