गोवरची साथ
आणि
लक्षणे
1
गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक (विषाणू) आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठतात.
2
गोवरची लस पहिल्या सहा महिन्यांनंतर १५ व्या महिन्यांत बाळाला द्यावी, जेणेकरून प्रतिकारशक्ती निर्माण होते
3
गोवराचा रुग्ण पुरळ यायच्या चार-पाच दिवस आधी आणि नंतर इतरांना संसर्ग देतो.
4
घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ आणि गोवर या मुलांच्या महत्त्वाच्या ६ सांसर्गिक आजारांत गोवराचा समावेश केलेला आहे.
5
आपल्या देशात गोवर मुलाच्या पहिल्या दोन-तीन वर्षे वयातच येऊन जातो, पण तो उशिराही येऊ शकतो.
6
थंड वातावरणात गोवरचा विषाणू बराच काळ राहू शकतो. म्हणून हिवाळयात हा आजार जास्त आढळतो.
7
गोवराच्या विषाणूंमुळे मेंदूला सूज येऊन मूल दगावू शकते. गोवराचा मुख्य दुष्परिणाम म्हणजे कुपोषण आणि न्यूमोनिया.
8
गोवराच्या लक्षणामध्ये डोळे लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला, इत्यादी त्रास जाणवतो.
9
निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही.
10