गरोदरपणात घ्यावयाची काळजी
1
पाळी नियमित असेल व आता मासिक पाळी चुकून दोन आठवडयांपेक्षा जास्त दिवस गेले असतील तर गर्भ धारणेची शक्यता धरावी.
2
पाळी चुकल्यानंतर १० दिवसांतच लघवी तपासून गर्भनिदान करता येते.
3
गर्भवती महिलांनी शरीरातील कॅल्शियमची समस्या दूर होण्यासाठी, आहारामध्ये जास्तीत-जास्त दूध, दही, ताक आणि चीजचा समावेश करावा.
4
पहिल्या चार महिन्यात आणि शेवटच्या आठव्या महिन्यानंतर मातेने वजन उचलणे व वाकण्याचे काम करु नये.
5
गर्भवती महिलांना प्रवास करण्यासाठीचा सर्वांत सुरक्षित कालावधी हा बारा आठवड्यांपासून ३४ आठवड्यांपर्यंत असतो
6
गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे.
7
प्रत्येक मातेने आपले हिमोग्लोबीन दर तीन महिन्यांनी तपासणे आवश्यक आहे.
8
गरोदरपणात मातेचे वजन ८ ते १२ किलोग्रॅमने वाढलेले असावे, यासाठी प्रत्येक मातेने आपल्या वजनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
9
सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचे दूध द्यावे. बाळाला पाणी देवू नये सात ते अकरा महिन्यापर्यंत बाळाला पातळ द्रव्य द्यावे.
10