बहुपयोगी तुळस
1
तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे.
2
तुळसी या वनस्पती मध्ये भरपूर औषधीय गुणधर्म असून, ते सर्वसाधारणपणे दोन ते सहा फूट उंच वाढते.
3
तुळशीस टाॅनिकही म्हंटले जाते कारण यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत
4
खोकला, सर्दी झाली असल्यास तुळस, आले, मिरी, लवंग यांचा काढा घेतल्यास आराम मिळतो.
5
सकाळी तुळशीच्या पानांचा रस सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. कृष्ण तुळशीची पाने ही औषधी म्हणून ओळखली जातात.
6
तुळशीच्या पानांचा रस रोज चमचाभर प्यायल्याने पोटाचे अनेक विकार कमी होण्यास मदत होते.
7
तुळशीच्या पानांचा रस पित्तनाशक म्हणून वापरला जातो; तसेच तुळशीच्या बिया मूत्रविकारात फार उपयुक्त ठरतात.
8
तुळस ही हवा शुद्ध करण्याचे काम करते. ताजी पाने खाल्ल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होते.
9
सर्दी खोकला ताप दांतदुखी श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुफ्फुसांचे रोग, ह्नदयाचे विकार, हया सर्वांमध्ये तुळस वापरली जाते.
10