विविध राशींची विशेषता
1
मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टीकोण ठेवणाऱ्या, धीट आणि महत्त्वाकांक्षी असतात.
2
वृषभ ही रास चंद्राची रास आहे. या राशीच्या व्यक्ती तेजस्वी, बुद्धिमान असतात. लोकांना आपलेसे करणारी ही रास आहे.
3
मिथुन ही वायुतत्वाची रास आहे. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो.
4
कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे
5
सिंह राशी ही अग्नितत्त्व, पुरुष रास आहे. जिद्दीने उभारी घेण्याची हिंमत ठेवतात. मिरवण्याची हौस असते, मान सन्मान आवडतात.
6
कन्या रास ही बुद्धीचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद याच्या जोरावर उत्कृष्ट लोकप्रियता मिळते, परंतु अंतर्मनाचा थांग लागू देत नाहीत.
7
तूळ रास ही या व्यक्ती आकर्षक, सुंदर, प्रेमळ, कष्टाळू, सौंदर्य प्रेमी, न्यायप्रिय, आणि नीतिवान असतात.
8
वृश्चिक राशीची माणसे शारीरिक दृष्ट्या चिवट,काटक व स्पष्टवक्ती असतात. कुटुंबावर अतिशय प्रेम करतात.
9
धनू रास ही द्विस्वभावी राशी आहे. ही रास असलेल्या माणसाचा स्वभाव काहीसा संतापी, पण याचवेळी संयमी आणि सात्त्विक असतो.
10
मकर राशीचे लोक खूप व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी,शिस्तप्रिय, संयमी असे असतात.
11
कुंभ राशीचे लोक हुशार, मैत्रिपूर्ण, निसर्गप्रिय, प्रामाणिक, स्वावलंबी, नवीन संकल्पना सुचणारी असतात.
12
मीन राशीचे लोक सदैव मदतीस तत्पर, संवेदनशील, कल्पक, कधीही नाही न म्हणणारे असे असतात.
13