वसुबारस २०२२
1
आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
2
समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो.
3
वर्षभरात येणारे सण-उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते.
4
वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
5
ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते.
6
या दिवशी श्री विष्णूंची आपतत्त्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते.
7
भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
8
घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे.
9
दीपावली आणि वसुबारसच्या शुभेच्छा
10