योगासनाचे  विविध फायदे

1

जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल  तर आपल्या  आयुष्यात  योगाचा  समावेश  करावा.

2

धनुरासन -  मांड्या, हिप जॉइंट्स, जांघा, पाठीचा कणा, पोटाचे स्नायू  ह्यांची लवचिकता वाढते

3

अर्धमत्स्येंद्रासन - कोअरच्या सगळ्याच स्नायूंना बळकटी येते. पाठीचा कणा, खांदे, हिप्स, मान मोकळे होतात.

4

नौकासन -  हे आसन केल्याने प्रामुख्याने पोटाच्या स्नायूंची ताकद वाढते, यकृताचे,स्वादु आणि  मूत्रपिंडांचे  कार्य  सुधारते.

5

सर्वांगासन -  खांदे आणि मान बळकट होतात.  मेंदूला शांतता मिळते, शरीरातला ताण कमी  होतो.

6

हलासन -  पाठीच्या कण्याला बाहेरच्या बाजूने, मानेपासून माकडहाडापर्यंत उत्तम  ताण मिळतो.

7

शलभासन -  छाती, खांदे, पोट आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते. सायटिकाचा  त्रास कमी  व्हायला मदत  होते.

8

बद्धकोनासन -  मांडीचा आतला  भाग, गुडघ्यांची  आणि जांघांची  लवचीकता  वाढते.

9

योगा केल्यामुळे  आपलं शरीर  नेहमी निरोगी  आणि  चांगलं राहातं.

10

योगाचा उपयोग नेहमीच  शारीरिक,  मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांसाठी  केला जातो.

11