31.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeDapoliदापोलीमध्ये कौन बनेगा नगराध्यक्ष ? कृपा घाग, शिवानी खानविलकरांचे नाव चर्चेत

दापोलीमध्ये कौन बनेगा नगराध्यक्ष ? कृपा घाग, शिवानी खानविलकरांचे नाव चर्चेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरु आहे.

दापोलीतील १४ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या विद्यमान नगराध्यक्ष ममता मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात येत असून यासंदर्भातील अधिकृत पत्र मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. नगराध्यक्षपदासाठी कृपा घाग आणि शिवानी खानविलकर यांची नावे चर्चेत असून उपनगराध्यक्ष पदासाठी विलास शिगवण यांचे नाव आघाडीवर आहे. रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम कोणाला निवडतात याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरु आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी पूर्ण केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अनिल परब यांच्या पुढाकाराने दापोली नगरपंचायतीत स्थापन झालेल्या सत्तेला हादरा बसला आहे. आता लवकरच ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर अविश्वास ठराव मांडला जाणार आहे.

लवकरच बदल – यासाठी जिल्हा प्रशासनाला मंगळवारी ४ मार्च रोजी पत्र देण्याते आलं आहे. त्यामुळे आता दापोलीत नगरपंचायतीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष बदल होणार हे निश्चित झालं आहे. नगराध्यक्ष पदासाठी कृपा घाग, तर उपनगराध्यक्ष पदासाठी विलास शिगवण यांची नाव चर्चेत आहेत. आता प्रशासनाकडून लवकरच बैठक लावण्यात आल्यानंतर हा ठराव पारित केला जाणार आहे.

१४ जणांचा गट शिवसेनेत – दापोली नगरपंचायतीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन १४ जणांचा एकत्र गट स्थापन करून ८ दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या युवा नगरसेविका शिवानी खानविलकर यांच्याकडे या गटाचं नेतृत्व आहे. मात्र यामध्ये ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांचा समावेश नसून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

कृपा घाग की शिवानी खानविलकर? – नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी दोन नावं चर्चेत आहेत. नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर विश्वास ठराव आणल्यावर आता शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग व शिवानी खानविलकर यांची नाव चर्चेत आहेत. नगराध्यक्षपद हे एक-एक वर्षासाठी दिलं जाऊ शकतं. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले ज्येष्ठ कार्यकर्ते व नगरसेवक विलास शिगवण हे उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे आता या दोन्ही पदांवर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम घेणार आहेत. त्यामुळे आता या बदलाकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular