26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiri...आणि आठ नवजात शिशूंना मिळाली नवदृष्टी

…आणि आठ नवजात शिशूंना मिळाली नवदृष्टी

आठ नवजात बालकांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्याने त्यांच्यात येणारे कायचे अंधत्व दूर होऊन त्यांना नवदृष्टी मिळाली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील विशेष नवजात फेअर युनिटमुळे (SNCU) डोळ्याचा दोष असलेल्या ८ नवजात शिशूंचे अंधत्व दूर करण्यास यश आले आहे. या दृष्टीहीन बालकांवर आरबीएसके आणि डीआयई या कार्यक्रमाअंतर्गत डॉ. प्रतिभा छडी (रेटिनातज्ज्ञ) यांनी तातडीने उपचार केल्याने आठ बालकांना नवदृष्टी मिळाली आहे. नवजात शिशूच्या चाचण्या वेळेवर झाल्या तर त्यांच्यातील कायमचे अंधत्व दूर होऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अशा आठ नवजात बालकांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्याने त्यांच्यात येणारे कायचे अंधत्व दूर होऊन त्यांना नवदृष्टी मिळाली आहे. यात मध्यप्रदेशातील कामगाराच्या बालकाचा व रत्नागिरीतील बालकांचा समावेश आहे.

रत्नागिरीतील दोन महिलांची जिल्हा शासकीय रुग्णालयात नॉर्मल प्रसूती झाली तर मध्यप्रदेशातून कामानिमित्त दापोलीत आलेल्या एका कामगाराच्या पत्नीची दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नॉर्मल प्रसूती झाली होती. दोन किलोपेक्षा कमी वजन असल्याने या बाळाच्या रुग्णालयाच्या ‘डीईआयसी’ कार्यक्रमाअंतर्गत कानासाठी ‘ओएई’ आणि दृष्टीसाठी X आरओबी या चाचण्या करण्यात आल्या. या वेळी या बालकांमध्ये तीव्र दृष्टिदोष आढळून आला. या बालकांना जिल्हा रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशू काळजी कक्षात (एसएनसीयू) ठेवून त्यांच्यावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य (आरबीएसके) आणि ‘डीआय’ कार्यक्रमाअंतर्गत उपचार करण्याचा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी घेतला.

या शस्त्रक्रिया अवघड आणि आव्हानात्मक होत्या. त्यासाठी आवश्यक असलेले ११ हजार रुपयांचे इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही; मात्र महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून हे इंजेक्शन मोफत उपलब्ध झाले. आरबीएसके आणि डीआयई या कार्यक्रमाअंतर्गत डॉ. प्रतिभा छडी (रेटिनातज्ज्ञ) यांनी तातडीने या बालकांवर उपचार केले. त्यामुळे बालकांना कायमस्वरूपी अंधत्वातून वाचवणे शक्य झाले. या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केल्यानंतर काल त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. या वेळी या मातांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. या बाळांसाठी परिश्रम घेतलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय सूर्यगंध, एसएनसीयू इन्चार्ज सुवर्णा कदम तसेच जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे मातांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular