27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeSportsआयपीएलमध्ये आज राजस्थान-चेन्नई येणार आमनेसामने

आयपीएलमध्ये आज राजस्थान-चेन्नई येणार आमनेसामने

आजचा सामना जिंकत विजयाचं खातं उघडण्याचा राजस्थानच्या संघाचा प्रयत्न असणार आहे.

आयपीएलचा ११ वा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता हा खेळवण्यात येईल. खरं तर दोन्ही संघानी आतापपर्यंत दोन सामने खेळले आहेत. यापैकी राजस्थान रॉयल्सला दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, तर चेन्नईला एका सामन्यात पराक्भाचा सामना करावा लागला आहे. आजचा सामना जिंकत विजयाचं खातं उघडण्याचा राजस्थानच्या संघाचा प्रयत्न असणार आहे. तर विजयी लय परत मिळवण्याचा चेन्नईचा प्रयत्न असणार आहे. एकीकडे राजस्थानकडे संजू सैमसंग, सिमरन हेटमायर, यशस्वी जैस्वाल सारखे मॅच विनर खेळाडू आहेत. तर दुसरीकडे चेन्नईकडे रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे सारखे आक्रमक फलंदाज आहेत. दरम्यान, आजच्या सामन्यात कुणाचं पारडं जड आहे? तसेच दोन्ही संघाचे संभाव्य ११ खेळाडू कोण असू शकतात? जाणून घेऊया.

पिच रिपोर्ट – बरसापारा मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकुल आहे. त्यामुळे आज जोरदार फटकेबाजी बघायला मिळण्याची शक्यता आहे. या मैदानावर पहिल्या डावात सरासरी धावसंख्या १७२, तर दुसऱ्या डावात १५८ आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी या मैदानावर २५ टक्के सामने जिंकले, तर लक्षाचा पाठलाग करणाऱ्या संघांना ७५ टक्के सामने जिंकले आहेत. गेल्या १० सामन्यांत वेगवान गोलंदाजांनी ४९, तर फिरकीपटूंनी ४२ विकेट घेतल्या आहेत.

हेड टू हेड – राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आतापर्यंत २९ सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी १६ सामने चेन्नईने १३ सामने राजस्थानने जिंकले आहेत. गेल्या १० सामन्यांपैकी ६, तर चेन्नईने ४ सामने जिंकले आहेत. १२ मे २०२४ रोजी झालेल्या शेवटच्या लढतीत चेन्नईने ५ गडी राखून विजय मिळवला होता.

संभाव्य प्लेइंग ११ : चेन्नई सुपर किंग्ज – एमएस धोनी (यष्टिरक्षक), डेव्हन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, राहुल त्रिपाठी, रचिन रविंद्र, रवींद्र जडेजा, सॅम करन, रविचंद्रन अश्विन, मथीशा पथिराना, नूर अहमद

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जायसवाल, रियान पराग (कर्णधार), नीतीश राणा, वनिंदु हसरंगा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्ण, जोफ्रा आर्चर

RELATED ARTICLES

Most Popular