23 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeCareerभारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ पदभरती २०२२

भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ पदभरती २०२२

कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं (National Film Development Corporation of India)  काही रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ३४ रिक्त पदं भरण्याची आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ४ जुलै २०२२ पासून सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०२२ आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन सबमिट करू शकतात.

पदांची संख्या : ३४

NFDC भर्ती २०२२ मधील महत्त्वाची तारखा :

भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : ०४ जुलै २०२२

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जुलै २०२२

कोणकोणत्या पदांवर भरती करण्यात येत आहे? पदांची नावे खालीलप्रमाणे:

चित्रपट प्रोग्रामर, सहाय्यक चित्रपट प्रोग्रामर, फेस्टिवल को ऑर्डिनेटर, ​​​​​​​डेलिगेट रजिस्ट्रेशन, फिल्म शेड्यूलर

​​​​​​​फेस्टिवल असिस्टंट, अटेंडर, ​​​​​​​डेप्युटी डायरेक्टर, सीनियर/ज्युनियर प्रोग्रामर, ​​​​​​​कंसल्टंट, असिस्टंट प्रोग्रामिंग कोऑर्डिनेटर, ​​​​​​​संपादक/सहाय्यक,ज्युनियर कार्यकारी, वरिष्ठ प्रोग्रामर, ​​​​​​​सीनियर प्रोग्रामर असिस्टंट, प्रूफ रिडर, आंतरराष्ट्रीय अतिथी संबंध/घरगुती अतिथी संबंधांचे कार्यकारी.

वयोमर्यादा :

या पदांसाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा आखून दिली आहे ती ४५ वर्ष इतकी आहे.

पदांसाठी वेतनश्रेणी :

या पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांचं वेतन ३० हजार ते १ लाख वीस हजार रुपये इतके असेल. तसेच, उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना वाचण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular