32.6 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

इन्फिगो थ्री डी आय क्लिनिकचे पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणीव...

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...
HomeCareerराज्यात ७ हजार पदांसाठी पोलीस भरती, गृहमंत्र्यांची घोषणा

राज्यात ७ हजार पदांसाठी पोलीस भरती, गृहमंत्र्यांची घोषणा

गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांमधील २०१९ च्या भरती प्रक्रियेनुसार ५२०० पदांची भरती होणार होती. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निवड झालेले उमेदवार सेवेत रुजू होत आहेत.

कोरोना काळात राज्यातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. गेली दोन वर्ष कोणतीही पोलीस भरती झाली नव्हती. राज्यभरात लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत. कित्येक महिन्यांपासून त्यांचे डोळे पोलीस भरतीकडे लागले होते. अखेर महाविकास आघाडीने कोरोना सरल्यानंतर उशिरा का होईना पण ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात ७ हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात ५२०० पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २०० पोलीस भरण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन कार्यवाही सुरु करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची ५० हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular