25.8 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeMaharashtra१ एप्रिल पासून सिलेंडर आणि सोन्याच्या विक्रीत बद्दल

१ एप्रिल पासून सिलेंडर आणि सोन्याच्या विक्रीत बद्दल

आर्थिक वर्ष २०२२- २३ दोन दिवसांत संपत आहे. यानंतर १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होईल. यामध्ये अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट आपल्या खिशावर परिणाम होईल.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामधील अनेक बदल हे तुमच्या आर्थिक परिस्थितीला प्रभावित करतात. दोन दिवसांनंतर एप्रिल महिना सुरु होते. नवीन महिना असण्यासोबतच नवीन आर्थिक वर्ष देखील सुरु होतंय. म्हणजेच २०२३ २०२४ हे आर्थिक वर्ष सुरु होतंय. यामुळे बदलांची यादी ही मोठी आहे. १ एप्रिलपासून सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. यासोबतच सोन्यांच्या विक्रीविषयीही नवीन नियम लागू होणार आहोत. याविषयी सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

पहिला बदल : सरकारी गॅस कंपन्या दरमहिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमतींमध्ये बदल करतात आणि नवीन रेट जारी केले जातात. मार्च महिन्याच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३५० रुपयांनी वाढ झाल्याने एलपीजी ग्राहक हैराण झाले होते. येत्या १ तारखेला देखील या किंमतींमध्ये बदल होऊ शकतात. एलपीजीसोबतच सीएनजी-पीएनजीच्या किमतींमध्येही बदल होऊ शकतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट्सनुसार, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढण्याची शक्यता कायम आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बदल दिसून येतो.

दुसरा बदल: सोन्याच्यादागिन्यांच्या विक्रीशी संबंधित नियम १ एप्रिलपासून बदलणार आहे. ग्राहक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन नियमानुसार, ३१ मार्च २०२३ नंतर, ४-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असलेल्या दागिन्यांच्या विक्रीवर बंदी घातली जाईल. १ एप्रिल २०२३ पासून केवळ ६-अंकी हॉलमार्क कणखऊ दागिने विकले जातील. मात्र ग्राहक त्यांचे जुने दागिने हॉलमार्किंगशिवाय विकू शकतील.

तिसरा बदल : २०२३ च्या अर्थसंकल्पात, हाय प्रीमियमच्या इंन्शुरन्समुळे होणाऱ्या कमाईवर टॅक्सची घोषणा करण्यात आलीहोती. या अंतर्गत, जर तुमच्या विम्याचा वार्षिक हप्ता ५ लाखांपेक्षा जास्त असेल, तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जाईल. आतापर्यंत इन्शुरन्सचे रेग्युलर उत्पन्न पूर्णपणे टॅक्स फ्री होते. याचा फायदा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सला मिळत होता. हा नियम १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे.

चौथा बदल : एप्रिलच्या सुरूवातीस, तुम्हाला फिजिकल गोल्डला ई-गोल्ड किंवा ई-गोल्डचे, फिजिकल गोल्डमध्ये रूपांतर करण्यावर कोणताही कॅपिटल गेन टक्स भरावा लागणार नाही. कॅपिटल गेन टॅक्सपासून मुक्ती देण्याची घोषणाही अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली होती. मात्र जर तुम्ही कन्वर्जननंतर हे गोल्ड विकले तर तुम्हाला डढउॠच्या नियमांनुसार टॅक्स द्यावा लागेल.

पाचवा बदल : नवीन आर्थिक वर्षात आणखी एक बदल होणार आहे. तो म्हणजे लक्झरी कार खरेदी करणं महागणार आहे. देशात बीएस-६ चा पहिला टप्पा संपणार आहे आणि दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular